Advertisement

ग्रॅंड मास्टरसोबत ऋषभ शाहची बरोबरी


ग्रॅंड मास्टरसोबत ऋषभ शाहची बरोबरी
SHARES

दक्षिण मुंबई चेस अकादमीतर्फे शनिवारी आयआयएफल, लोअर परळ येथे बुद्धिबळाची एक्झिबीशन स्पर्धा झाली. यामध्ये एकूण 40 मुलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ऋषभ शाह या युवा खेळाडूने युक्रेनिया ग्रॅंड मास्टर अलेक्झेंडर गोलोस्चापोव यांच्या सोबतची लढत बरोबरीत सोडवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. 

देशातील लहान मुलांमध्ये बुद्धिबळाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण देण्यासाठी हा कोचिंग कॅम्प आयोजित करण्यात आला होता. ही बुद्धिबळ स्पर्धा युक्रेनिया ग्रॅंड मास्टर अलेक्झेंडर गोलोस्चापोव यांच्या सोबत झाली. गोलोस्कपोव हा जगातील अव्वल 10 मधील एक ग्रॅंडमास्टर आहे. तो भारतातील ग्रॅंड मास्टर परिमरजन नेगी, शार्दुल गागरे, एस. पी. सेथुरमन यांच्या खेळला आहे. यामध्ये काही उत्कृष्ट खेळाडूंनी देखील सहभाग घेतलाा. त्यात सिल्व्हर मेडलीस्ट मृदूल देहाणकर आणि 7 वर्ष वयोगटातील चॅम्पियन सी. एम. कुशभगत सारखे खेळाडू होते.

मुंबईतल्या मुलांमध्ये खुप कौशल्य आहे. त्याच्या प्रतिभेमुळे त्यांना कोठेही मदत होईल. तसेच त्यांनी या पुढे जाउन बुद्धिबळच्या माध्यमातून प्रेम आणि बांधिलकीची संधी मिळेल, असे युक्रेनियचा ग्रॅंड मास्टर अलेक्झेंडर यांनी संगितले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा