Advertisement

‘कोण होणार करोडपती’मध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरू

सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’ सुरू होणार आहे. एक मिस्ड कॉल देऊन तुम्ही कोण होणार करोडपतीमध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता.

‘कोण होणार करोडपती’मध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरू
SHARES

‘कोण होणार करोडपती’ या मराठी कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती. सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’ सुरू होणार आहे. एक मिस्ड कॉल देऊन तुम्ही कोण होणार करोडपतीमध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता.

अभिनेते सचिन खेडेकर या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार आहेत. या पर्वाचा पहिला प्रोमो सोनी वाहिनीने सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वीच शेअर केला होता. या पर्वात सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना २४ मार्च ते २ एप्रिल २०२१ पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. 

महाराष्ट्राने अनेक नामवंत जगाला दिले आहेत. महाराष्ट्र खऱ्या अर्थानं विद्येचं माहेरघर आहे. ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात माहीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या, मराठी मातीतल्या माणसांना हॉटसीटवर बसण्याची आणि करोडपती होण्याची संधी मिळणार आहे.

‘कोण होणार करोडपती’ ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी २४ मार्चपासून नोंदणी सुरू होणार आहे. नुकतीच सोनी मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्रामवर या संदर्भात पोस्ट शेअर केली आहे. सोनी वाहिनीने म्हटलं आहे की,  पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ८०८००४४२२२ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या किंवा सोनी लिव्ह या ॲपवर जाऊन नोंदणी सुरू करा. २ एप्रिलपर्यंत तुम्ही या स्पर्धेत सहभागी होऊ शकता. @sachinskhedekar #कोणहोणारकरोडपती हे हॅशटॅग वापरत ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक प्रश्न विचारला आहे. स्पर्धकांना याचे उत्तर देऊन या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. 

हेही वाचा -

  1. अॅमेझॉन प्राईम व्हिडिओच्या 'पिकासो'वर राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची मोहोर!

  1. आगामी थ्रिलर 'ए थर्सडे'मध्ये पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार माया सराओ!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा