Advertisement

डॉ. निलेश साबळे घेऊन येत आहेत 'लावा रे तो व्हिडिओ'

झी युवा वाहिनीवर लवकरच एक नवाकोरा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

डॉ. निलेश साबळे घेऊन येत आहेत 'लावा रे तो व्हिडिओ'
SHARES

झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचे सूत्रधार डॉ. निलेश साबळे आता 'झी युवा' वाहिनीवरसुद्धा कल्ला करण्यासाठी सज्ज झाले आहेत. झी युवा वाहिनीवर लवकरच एक नवाकोरा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचं नाव आहे 'लाव रे तो व्हिडीओ'. महत्वाचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो.

'लाव रे तो व्हिडीओ' या कार्यक्रमातून, महाराष्ट्रातील लोकांचे छुपे टॅलेंट जे आजवर केवळ मोबाइल किंवा इंटरनेटवर अड्कले होते आता लाखो करोडो लोकानां टीव्हीवर पहायला मिळेल. संपूर्ण महाराष्ट्राचे हमखास मनोरंजन होईल. नीलेश साबळेंबरोबर आणखी एक सेलिब्रिटी प्रत्येक भागात सहभागी होणार आहेत.

झी युवा वाहिनी प्रेक्षकांसाठी एक झकास एंटरटेनमेंट पॅकेज घेऊन येत आहे. लॉकडाऊनमुळे आलेली मरगळ, कंटाळा, वैताग या सगळ्या गोष्टींवर मात करून खळखळून हसण्यासाठी, आता आपल्याला सगळ्यांना सज्ज व्हायचं आहेएक आगळीवेगळी संकल्पना, प्रेक्षकांचा स्पर्धक म्हणून थेट सहभाग यामुळे या कार्यक्रमाची रंगत अधिक वाढणार आहे.



हेही वाचा

सुशांतचं 'हे' अर्धवट स्वप्न होणार पूर्ण, टीम घेणार जबाबदारी

बाॅलिवूड राजकारण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा