Advertisement

टीव्ही कलाकार हिना खानच्या वडिलांचं निधन

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचं मंगळवारी निधन झालं आहे.

टीव्ही कलाकार हिना खानच्या वडिलांचं निधन
SHARES

अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचं निधन (hina khan's father passes away) झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचं मंगळवारी निधन झालं आहे.

कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं आहे. हिना सध्या कामानिमित्त काश्मीरमध्ये होती. वडिलांच्या निधनाची बातमी कळताच ती मुंबईसाठी रवाना झाली आहे.

हिना खान आपल्या वडिलांच्या खूपच जवळ होती. ती सतत आपल्या सोशल मीडियावर आपल्या वडिलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत होती. यामध्ये त्यांच्यातील प्रेम नेहमीच दिसून येत होतं. ती सतत आपल्या चाहत्यांसाठी आपल्या कौटुंबिक गोष्टी शेअर करत असते. वडिलांच्या निधनानं हिनावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हिना खान ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील ‘अक्षरा’ या पात्रानं ती घराघरात पोहोचली होती. हिना खानला छोट्या पडद्यावरील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणलं जातं. त्याचबरोबर हिना बिग बॉसमध्ये सुद्धा झळकली होती. त्यातसुद्धा प्रेक्षकांनी तिला चांगली पसंती दर्शवली होती.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा