Advertisement

१८ व्या संस्कृती कलादर्पण नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर


१८ व्या संस्कृती कलादर्पण नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर
SHARES

मराठी रंगभूमीचा गौरव करणारा मानाचा पुरस्कार म्हणजे संस्कृती कलादर्पण पुरस्कार. यावर्षी संस्कृती कलादर्पण संस्थेतर्फे या पुरस्कारांसाठी व्यावसायिक नाटकांसाठीची स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर झाला असून स्पर्धेतील निवडक नाटकांची अंतिम फेरी ७, ८ आणि ९ एप्रिल २०१८ रोजी माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिर येथे आयोजित केली आहे.

या व्यावसायिक नाट्य स्पर्धेत मुंबई आणि पुणे येथील एकूण २५ नाट्यसंस्थांनी प्रयोग सादर केले.


अंतिम फेरीसाठी या नाटकांची निवड

वेलकम जिंदगी (त्रिकूट,मुंबई)
संगीत देवबाभळी (भद्रकाली प्रॉडक्शन्स)
अनन्या (सुधीर भट थिएटर्स)
माकड (श्री स्वामी समर्थ आर्टस)
अशीही श्यामची आई (सुधीर भट थिएटर्स)

या विभागासाठी प्राजक्ता कुलकर्णी दिघे, प्रकाश निमकर, संजय डहाळे, चंद्रशेखर सांडवे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. काही तांत्रिक कारणास्तव या पाच नाटकांपैकी जर कोणत्याही नाटकाचा प्रयोग करणे शक्य नसल्यास परीक्षकांना (जाई वल्लरी फॉर यू प्रोडक्शन), स्टॅच्यु ऑफ लिबर्टी (अद्धैत थिएटर) या दोन नाटकांपैकी एकाचा निवड करत यापैकी एक नाटक सादर करता येईल.

अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या सर्व नाट्य संस्थांचे संस्कृती कलादर्पण संस्थेतर्फे हार्दिक अभिनंदन. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्पर्धा अटीतटीची होणार आहेत. सगळीच नाटकं खूप चांगली आहेत. त्यामुळे एखाद्या नाटकाची निवड करणे कठीण आहे.
- अर्चना नेवरेकर, अध्यक्ष

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा