Advertisement

शारदा थिएटरला टाळं


शारदा थिएटरला टाळं
SHARES

दादर (पू) येथील ४५ वर्ष जुना शारदा थिएटरला १ डिसेंबरपासून टाळे लागले आहे. कराराचे नूतनीकरण (कॉन्ट्रॅक्ट रिन्यू) न करण्यात आल्याने थिएटर बंद पडल्याचे बोलले जात आहे.


करार संपल्यानं थिएटर बंद?

हिंदी सिनेमांसाठी प्रसिद्ध असलेले हे थिएटर १९७२पासून सुरु होतं. या थिएटरचा करार ३० नोव्हेंबरला संपलं असून सध्या त्याचा ताबा मुंबई मराठी ग्रंथलायाकडे आहे. ४५ वर्षानंतर आता हे थिएटर बंद पडले आहे.


येथे हिंदीसोबतच मराठी सिनेमाही रिलीज

अनेक हिंदी सिनेमा इथेच प्रदर्शित झाले होते. पण काहीकाळानंतर ज्येष्ठ अभिनेते दादा कोंडके यांनी या थिएटरमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरुवात केली. 'रामराम गंगाराम', 'ह्योच नवरा हवा' यांसारखे अनेक मराठी चित्रपट इथे प्रदर्शित झाले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा