Advertisement

चतुर्दशीला विघ्नहर्त्याच्या भूमिकेत मुंबई पोलीस!


चतुर्दशीला विघ्नहर्त्याच्या भूमिकेत मुंबई पोलीस!
SHARES

मुंबई- अनंत चतुर्दशीचा महासोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. काही वेळातच बाप्पा ढोल ताशांच्या गजरात आपल्या परतीच्या प्रवासाला निघतील. यावेळी बाप्पाला बघण्यासाठी अवघी मुंबई रस्त्यावर असेल. मुंबईचे समुद्र किनारे भक्तांच्या गर्दीने फुललेले असतील, यावेळी विघ्नहर्त्याच्या भूमिकेत असतील मुंबई पोलीस.तब्बल ४५ हजार अधिकारी आणि पोलीस कर्मचारी गणेशोत्सवासाठी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेत. एवढचं नाही तर, महिला छेड़छाड़ पथक, मंगळसुत्र चोरी विरोध पथक याचबरोबर नुकतंच मुंबई पोलीस दलात सहभागी झालेले २०० महिला बीट मार्शलही गणेशोत्सव काळात मुंबईत तैनात करण्यात आलेत. विर्सजनाचा हा सोहळा निर्विघ्न पार पडण्यासाठी मुंबई पोलिसांनी संवेदनशिल ठिकाणे आणि विर्सजन पॅईटवर वॉच टॉवर, सीसीटिव्ही कॅमेरा आणि ड्रोनच्या साहाय्याने संपूर्ण शहरावर नजर ठेवली आहे. यावर्षी देखील पोलिसांनी मुंबईला एका छावणीचं स्वरुप दिलंय. ४ सह पोलीस आयुक्त, ११ अपर पोलीस आयुक्त, ३३ पोलीस उपायुक्त, ६ कंपनी राज्य राखीव दल आणि पॅरामिलेक्टरी फोर्स, ३२०० ट्रेनी पोलीस, १००० होमगार्डचे जवान,नागरी सरक्षंण दलाचे ५०० कर्मचारी, आणि १५० प्रोबेश्नरी पोलीस उप निरीक्षक, आपत्ती व्यवस्थापनाचे ६००० स्वयंमसेवक, नागरी सरंक्षण दलाचे १५०० जवान, एनएसएसचे ९०० विद्यार्थी, स्काउट गाईडचे ३०० विद्यार्थी, ३९० वाहतूक रक्षक, रस्ता सुरक्षा दलाचे १०० शिक्षक, राष्ट्रीय छात्रसेनेचे ४०० विद्यार्थी, ३ हजार ५३६ वाहतूक पोलीस, सशस्त्र दलाचे १०० जवान आणि हॅम रेडीओचे ३५ स्वयंसेवक असा भक्कम पोलीस आणि एनजीओंचा मोठा बंदोबस्त मुंबईभर ठेवण्यात आला आहे.तसेच राज्य दहशतवाद विरोधी दल (एटीएस), बॉम्ब शोधक आणि नाशक कक्ष, शिघ्रकृती दल, फोर्सवन आणि सिव्हील डिफेन्स तैनात ठेवण्यात आल्याचे पोलीस प्रवक्ते पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी सांगितले.

शहरातील वाहतूक व्यवस्था..
विसर्जनानिमित्त 49 रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.
५५ रस्ते एकदिशा मार्ग, १८ मार्ग अवजड वाहनांसाठी बंद,
९९ रस्त्यांवर वाहनांच्या पार्किगला बंदी घालण्यात आली आहे.
गिरगाव चौपाटी, शिवाजीपार्क-दादर चौपाटी, जुहू चौपाटी, पवई गणेश घाट अशा महत्वाच्या विसर्जन ठिकाणांसह विर्सजन मिरवणूकांच्या मार्गावर ३,५०० वाहतूक पोलिसांसोबत, सशस्त्र पोलिसांचे १०० जवान आणि अन्य स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक असे मिळून तब्बल १४ हजार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा