Advertisement

मध्य रेल्वेवर 10 तासांचा विशेष ब्लॉक


मध्य रेल्वेवर 10 तासांचा विशेष ब्लॉक
SHARES

मुंबई: मुंबईत उद्या मध्य रेल्वेवर 10 तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या दहा तासांच्या मेगा ब्लॉकदरम्यान सीएसटी-कल्याण नवीन जलद लाईनचं काम केलं जाणार असल्याने मध्य मार्गावरील लोकलसह अनेक एक्स्प्रेसही रद्द करण्यात आल्या आहेत.

रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दिवा स्थानकात लोकल लाईनच्या कट-कनेक्शन कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे सीएसटी ते कल्याणपर्यंत नवीन जलद लाईन उपलब्ध होणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल सेवांवर परिणाम होणार असल्यानं कोयना, सिंहगड, प्रगती, गोदावरी अशा 10 मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय लोकांची गैरसोय पाहता, इतर लोकल गाड्यांनी विशिष्ट ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.

संबंधित विषय
Advertisement