Advertisement

ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामाचा मुहूर्त निघाला; मध्यरेल्वेवर १० तासांचा मेगाब्लॉक


ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामाचा मुहूर्त निघाला; मध्यरेल्वेवर १० तासांचा मेगाब्लॉक
SHARES

ठाणे ते दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामाचा मुहूर्त पुन्हा एकदा निघाला आहे. गेल्या १२ वर्षांपासून चर्चेत असलेल्या या मार्गाला मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) आणि मध्य रेल्वेकडून गती दिली जात आहे. या कामासाठी रविवारी मध्य रेल्वेवर दहा तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

अनेक लोकल फेऱ्या रद्द होणार असल्याने जादा बस सेवा देण्याची विनंती मध्य रेल्वेनं राज्य सरकारकडे केल्याची माहिती समोर येत आहे. मेल-एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेवर ‘एमआरव्हीसी’मार्फत पाचवा-सहावा मार्ग उभारण्यात येत आहे.

त्यामुळे ठाणे ते कल्याणबरोबरच सीएसएमटीपासूनही लोकल गाड्यांसाठी प्रवास सुकर होणार आहे. आतापर्यंत कल्याण ते दिवा आणि ठाणे ते कुल्र्यापर्यंतच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या दहा वर्षांत ठाणे ते दिवा पाचव्या व सहाव्या मार्गाच्या कामाला अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली.

मार्च २०१९ ही अंतिम मुदत असताना त्यात वेळोवेळी बदल करण्यात आले. आता डिसेंबर २०२१ किंवा पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत तरी काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमआरव्हीसी आणि मध्य रेल्वेने ठेवले आहे. या मार्गिकांची रूळ जोडणीसह अन्य तांत्रिक कामे मोठ्या प्रमाणात केली जाणार असून त्यासाठी येत्या काही महिन्यांत मोठे मेगा ब्लॉक घ्यावे लागणार असल्याचे सांगण्यात आलं.

येत्या रविवारी २६ सप्टेंबरला दहा तासांचा मेगा ब्लॉक दिवा ते ठाणेदरम्यान घेण्याचे नियोजन केले आहे. यामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या व येणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार आहे. या ब्लॉकबरोबरच ऑक्टोबर महिन्यात ५ ब्लॉक घेण्यात येणार असून ते रात्री घेण्यात येतील. तर नोव्हेंबर व डिसेंबरमध्येही १० तासांहून अधिक कालावधीचे मोठे मेगा ब्लॉक होणार आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा