Advertisement

येत्या २ वर्षांत १० मोनो धावणार

मेट्रो प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पुढील २ वर्षात १० ट्रेनची निर्मिती करण्यात येणार आहे.

येत्या २ वर्षांत १० मोनो धावणार
SHARES

मेट्रो प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पुढील २ वर्षात १० ट्रेनची निर्मिती करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मोनोरेलच्या कार्यप्रणालीसाठी पुरेसे मनुष्यबळ तैनात केले आहे. स्पेअर पार्टच्या उर्वरित साहित्यासाठीच्या खरेदीसाठी आणि आवश्यक उपकरणांकरिता प्राधिकरणाकडून वेगानं कार्यप्रणाली राबविली जात आहे.

नव्या १० ट्रेनच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रियादेखील पूर्ण झाली आहे. या नव्या ट्रेनची निर्मिती आत्मनिर्भर भारत या अभियानांतर्गत भारतात होणार आहे. पुढील दोन वर्षे चार महिन्यांत त्या ट्रेन सुरू होणार आहेत. मोनोरेलसाठीच्या पहिल्या कंत्राटदाराने कंत्राटानुसार १५ ट्रेनच्या तुलनेत केवळ ७ ट्रेनची मागणी पूर्ण केली होती.

७ पैकी केवळ ३ ट्रेन प्राधिकरणानं कार्यभार हाती घेतला तेव्हा कार्यान्वित होत्या. प्राधिकरणाने स्वदेशी स्पेअर पार्ट्सचा वापर करत इन हाऊस ४ ट्रेनची निर्मिती केली. त्या ट्रेन १८ मिनिटांच्या फ्रिक्वेन्सीवर धावत आहेत. नव्या १० ट्रेनच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रियादेखील पूर्ण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२३ पर्यंत मोनोरेलची पहिली गाडी मुंबईत दाखल होईल. तसंच, जानेवारी २०२४ पर्यंत मोनोरेलची दुसरी गाडी दाखल होईल. मेधा सर्व्हो ड्राइव्हस प्रायव्हेट लिमिटेडला याबाबतचे टेंडर मिळाल्याचं समजतं. संपूर्ण प्रकल्पाच्या कामाची किंमत ५९० कोटी रुपये आहे.

एका मोनोरेलमधून एका तासाला ७ हजार ५०० प्रवाशांना प्रवास करता येत आहे. दिवसाला मोनोरेलमधून एक लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करू शकतात. २०३१ पर्यंत ही संख्या २ लाख होईल. २०४१ पर्यंत हा आकडा ३ लाख होईल.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा