Advertisement

ओव्हर टाइम नाकारल्याने प. रेल्वेच्या १०० फेऱ्या रद्द


ओव्हर टाइम नाकारल्याने प. रेल्वेच्या १०० फेऱ्या रद्द
SHARES

मुंबईची लाइफलाइन अशी ओळख असलेल्या रेल्वेच्या मागील ४ दिवसांत तब्बल १०० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी रेल्वे वाहतुकीवर ताण पडल्याने प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत आहे. मात्र या फेऱ्या तांत्रिक बिघाडामुळे नव्हे तर मोटरमन्सनी ओव्हर टाइमला नाकार दिल्याने रद्द झाल्या आहेत.  


फेऱ्यांमध्ये गणना

पश्चिम रेल्वेवरील मोटरमननी जास्त तास काम करण्याला म्हणजेच ओव्हर टाइमला नकार दिल्याने मागील चार दिवसांत पश्चिम रेल्वेच्या १०० या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. मोटरमनचा ओव्हर टाइम हा तासांमध्ये गणला जात नसून तो फेऱ्यांमध्ये गणला जातो. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या मोटरमननी ८ तासचं काम करून ओव्हर टाइम लावला आहे.


ओव्हर टाइमचा आकडा...

मोटरमननी गेल्या तीन महिन्यांत केलेल्या ओव्हर टाइमचा आकडा ४.६ लाख रुपये पर्यंत झाला आहे. त्यामुळे दिवसाला नेमून दिलेल्या फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आपण अधिकच्या फेऱ्या करणार नसल्याचं मोटरमननी म्हटलं आहे. मोटरमननी जास्त तासाला नकार दिल्यानंतर पश्चिम रेल्वेच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. प्रवाशांना मात्र याचा त्रास सहन करावा लागत आहे.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय