SHARE

कोकणात गणपतीसाठी जाणा-यांना स्वस्त दरात प्रवास करता यावा यासाठी स्वाभिमान संघटनेतर्फे बससेवा सुरू करण्यात येणार आहे. या बसचं तिकीट फक्त 100 रुपये असेल. मुंबई ते सिंधुदुर्ग अशी ही बससेवा असेल. या बससेवेचा लाभ मुंबई-ठाण्यातल्या चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. 26, 27 आणि 28 ऑगस्ट या दिवशी तिकीटांसाठी वांद्रे पश्चिम इथल्या मुख्य कार्यालयात नोंदणी करण्यात येणार आहे. या बसेस 1, 2 आणि 3 सप्टेंबरला मुंबईहून सुटणार आहेत. त्याचा जास्तीत जास्त लाभ कोकणवासीयांनी घ्यावा, असं आवाहनही स्वाभिमान संघटनेकडून करण्यात आलं आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या