Advertisement

CSMT तील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी आजपासून 15 दिवस ब्लॉक

शुक्रवारपासून पुढचे 15 दिवस रात्री हा ब्लॉक असेल.

CSMT तील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी आजपासून 15 दिवस ब्लॉक
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मधील प्लॅटफॉर्म क्रमांक 10-11च्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. अभियांत्रिकी, विद्युतीकरणासंबंधित इंटरलॉकिंग कामे पूर्ण करण्यासाठी शुक्रवार 17 मे ते शनिवार १ जूनदरम्यान दररोज रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. शुक्रवारपासून पुढचे 15 दिवस रात्री 12 वाजून 14 मिनिटांची कसारा लोकल शेवटची असणार आहे.

सीएसएमटी ते भायखळादरम्यान हा ब्लॉक घेण्यात आला आहे. अप धीम्या, अप आणि डाउन जलद मार्ग, यार्ड मार्गिका, प्लॅटफॉर्म 10 ते 18 दरम्यान सर्व मार्गिकांवर हा ब्लॉक असेल. रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यत (रोज रात्री ६ तास) हा ब्लॉक असेल.

ब्लॉक कालावधीत उपनगरीय मार्गावर सीएसएमटी ते भायखळादरम्यान लोकल सेवा बंद राहणार आहे. सीएसएमटीहून शेवटची कसारा लोकल रात्री 12 वाजून 14 मिनिटांनी सुटणार आहे. तर कल्याणहून रात्री 10.34 सीएसएमटी लोकल शेवटची लोकल असेल.

प्लॅटफॉर्म 10-11च्या विस्तारीकरणाचे काम शेवटच्या टप्प्यात : लोकल, मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीत मोठे बदल

दादरहून सुटणाऱ्या मेल-एक्स्प्रेस

22157 सीएसएमटी-चेन्नई सुपरफास्ट मेल, 11057 सीएसएमटी-अमृतसर एक्स्प्रेस, 22177 सीएसएमटी-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस, 12051 सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस , 22229 सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस

पनवेल स्थानकात रद्द आणि रवाना

20111 सीएसएमटी-मडगाव कोकण कन्या एक्स्प्रेस पनवेल स्थानकातून सुटेल आणि 10104 मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस पनवेलपर्यंतच चालविण्यात येणार आहे.हेही वाचा

मुंबई : बेस्ट चालकांचा पुन्हा संपाचा इशारा

नागपाडा, क्रॉफर्ड मार्केट आणि गेट वे ऑफ इंडिया मेट्रोने जोडणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा