Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

शिवभोजन थाळी योजनेच्या विस्तारात बेस्टचा सहभाग

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार एप्रिल २०२० पासून आतापर्यंत बेस्टच्या २४ बसमध्ये ही सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली

शिवभोजन थाळी योजनेच्या विस्तारात बेस्टचा सहभाग
SHARES

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार एप्रिल २०२० पासून आतापर्यंत बेस्टच्या २४ बसमध्ये ही सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली. विशेष म्हणजे कोरोनाकाळातच या सेवेचा बेस्टने विस्तारही केला. महाआघाडी सरकारनं राज्यभर लागू केलेल्या शिवभोजन थाळी योजनेच्या विस्तारात बेस्ट उपक्रमालाही सहभागी करून घेतलं आहे.

शिवभोजन थाळी योजना गरजूंपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. त्याअनुषंगानं सरकारनं बेस्टच्या फिरत्या उपाहारगृहांमध्ये त्याचा लाभ देण्याचं ठरविलं होतं. तशा सूचनाही बेस्ट उपक्रमाला केल्या होत्या. कोरोनाकाळाच्या आधी बेस्टतर्फे काही ठिकाणी बसमध्ये फिरत्या उपाहारगृहांची सुविधा देण्यास सुरुवात केली. त्या उपाहारगृहांमध्ये सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात खाद्यपदार्थ उपलब्ध केले जात होते. त्या धर्तीवरच दोन विशेष बसमध्ये शिवभोजन थाळी योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या आदेशानंतर बेस्ट उपक्रमानं २ एकमजली बसची निवड केली. या दोन्ही बसमध्ये शिवभोजन थाळी योजनेच्या अनुषंगाने नवीन आरेखन तयार करण्यात आले. ते आरेखन करून त्याचे राज्य सरकारला सादरीकरण करण्यात आले. या बसमध्ये दुपारी १२ ते २ या वेळेत ७५ ते १०० जणांना थाळी पुरविण्याचे नियोजन बेस्ट व पालिके कडून करण्यात आले.

जानेवारी २०२० मध्ये याची तयारी सुरू के ल्यानंतर प्रत्यक्षात ही सेवा सुरू होण्यास एप्रिल २०२० उजाडला. करोनाचा वाढता संसर्ग व गरजूंची भूक भागविण्यासाठी या सेवेचा हळूहळू विस्तार करण्यात आला. सुरुवातीला दोन बसमार्फतच ही सेवा दिली जाणार होती. आतापर्यंत २४ बसगाडय़ांमधून शिवभोजन थाळीचे वाटप के ले जात असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली. भविष्यात आणखी काही बसगाड्यांमध्ये ही सेवा सुरू करण्याचा तूर्तास विचार नाही.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा