Advertisement

गणेशोत्सवानिमित्त बेस्टची नऊ मार्गांवर विशेष सेवा

गणेशोत्सव काळात मुंबईकरांसाठी विशेष बस सेवा चालवण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे.

गणेशोत्सवानिमित्त बेस्टची नऊ मार्गांवर विशेष सेवा
SHARES

गणेशोत्सव काळात मुंबईकरांसाठी विशेष बस सेवा चालवण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. मुंबईतील विविध ठिकाणच्या नऊ मार्गांवर २५ विशेष बसगाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत ही सेवा उपलब्ध असेल. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत या बस चालवण्यात येणार आहेत.

  • बसमार्ग क्र १ मर्या.- इलेक्ट्रीक हाऊस, कुलाबा आगार ते वांद्रे रेक्लेमेशन बसस्थानक
  • बस मार्ग क्र.४ मर्या- ओशिवरा आगार ते सर जे.जे रुग्णालय
  • बस मार्ग क्र. ७ मर्या-विक्रोळी आगार ते सर जे.जे रुग्णालय
  • बस मार्ग क्र.८ मर्या- शिवाजी नगर ते सर जे.जे रुग्णालय
  • बस मार्ग क्र ६६ मर्या.-राणी लक्ष्मीबाई चौक ते कुलाबा आगार
  • बस मार्ग क्र.२०२ मर्या- माहीम बस स्थानक ते बोरिवली स्थानक (पश्चिम)
  • सी-३०२ राणी लक्ष्मीबाई चौक ते महाराणा प्रताप चौक (मुलुंड)
  • सी-३०५ बॅकबे आगार ते धारावी आगार
  • सी-४४० माहीम बसस्थानक ते बोरिवली स्थानक (पूर्व)

दरम्यान, बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी गणेशोत्सवानिमित्त बेस्ट उपक्रमाने सवलतीची योजना सुरू केली आहे. चलो ॲप वापरणाऱ्या प्रवाशांना ७९९ रुपयांची सुपर सेवर योजना ७५ टक्के सवलतीत म्हणजेच १९९ रुपयांत उपलब्ध होणार आहे.

बेस्टनं सुरू केलेली ही योजना ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत वैध राहणार असल्याची माहिती उपक्रमाने दिली. यामध्ये २० रुपयांच्या ५० फेऱ्यांचाही समावेश असणार आहे.



हेही वाचा

बेस्टच! चलो ॲप वापरणाऱ्या प्रवाशांना ७५ टक्के सवलत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा