Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,97,587
Recovered:
57,53,290
Deaths:
1,19,303
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,577
863
Maharashtra
1,21,859
10,066

बेस्टच्या ताफ्यात २६ एसी इलेक्ट्रिक बस दाखल


बेस्टच्या ताफ्यात २६ एसी इलेक्ट्रिक बस दाखल
SHARES

बेस्टच्या ताफ्यात आणखी २६ एसी इलेक्ट्रिक बस गाड्या दाखल झाल्या आहेत. या सर्व गाड्या भाडेतत्त्वावरील आहेत. भाडेतत्त्वावरील ४० आणि बेस्टच्या मालकीच्या ६ विद्युत बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात आहेत. दरम्यान, प्रवासी संख्या वाढत असताना बेस्ट बसचा ताफाही वाढत आहे. त्यामुळं आता प्रवाशांना वेळेवर बस मिळेल, शिवाय उत्पन्नात ही वाढ होईल अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व इंधनाची बचत करण्यासाठी बेस्ट परिवहन विभागाच्या ताफ्यात विजेवर चालणाऱ्या ३०० बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल केल्या जातील, अशी घोषणा बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी केली होती. आतापर्यंत केवळ ४० बसेस दाखल झाल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात टप्प्याटप्प्याने उर्वरित बसेस दाखल होणार होत्या. त्यापैकी टाटा मोटर्सच्या २६ बसेस गुरुवारी दाखल झाल्या.

आरटीओ पासिंगची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती मिळते. बेस्ट परिवहन विभागाच्या स्वत:च्या मालकीच्या ६ व भाडेतत्त्वावरील ६६ अशा एकूण ७२ गाड्या आतापर्यंत झाल्या आहेत. 

इंधनाच्या धुरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. विजेवर चालणाऱ्या गाड्या ही काळाची गरज आहे. त्यानुसार बेस्टने विद्युत गाडय़ांचा ताफा वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या गाडय़ांच्या चार्जिगसाठी सध्या बॅकबे व वरळी बस आगारात चार्जिग केंद्र उभारली आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा