Advertisement

एसटी मालवाहतुकीच्या दरात होणार वाढ


एसटी मालवाहतुकीच्या दरात होणार वाढ
SHARES

मागील अनेक वर्षांपासून एसटी महामंडळ मोठ्या प्रमाणात तोटा सहन करत आहे. यामुळं या तोट्यातून बाहेर काढण्यासाठी एसटी महामंडळ अनेक उपाययोजना राबवत आहे. अशातच एसटी महामंडळावर इंधन दरवाढीमुळे संकट ओढावलं आहे. वाढत्या डिझेल दरामुळे महामंडळानं मालवाहतुकीच्या प्रति किलोमीटर दरात ४ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवार ११ जानेवारीपासून नवीन दरवाढ लागू होणार आहे. नवीन दरानुसार मालवाहतुकीसाठी प्रति किमी ४२ रुपये दर आकारला जाणार आहे. महामंडळाला डिझेलचा पुरवठा २ बड्या इंधन कंपन्यांकडून होतो. महामंडळ हे घाऊक विक्रेते असल्यानं त्यांचे दर १५ दिवसांनी बदलतात. महामंडळाला दिवसाला १ लाख लिटर डिझेल लागत असून, डिझेल खरेदीसाठी वर्षांला ३ हजार कोटींची तरतूद केली जाते.

लॉकडाऊनमध्ये प्रवासी वाहतूक बंद असल्यानं उत्पन्न मिळविण्यासाठी महामंडळानं मालवाहतूक सुरू केली.१ हजार १२५ प्रवासी एसटी गाड्यांमध्ये बदल करून त्याचे मालवाहतूक ट्रक तयार केले आहेत. सध्या त्यांच्या ६२ हजार फेऱ्या होत असून ३५ कोटी रुपये उत्पन्न मिळते. मात्र सातत्याने डिझेलच्या दरात वाढ होत असल्यानं महामंडळानं अखेर मालवाहतुकीचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मालवाहतूक

  • १०० किमीच्या आतील मालवाहतुकीसाठी एसटीला मोठा प्रतिसाद आहे.
  • एकेरी मालवाहतुकीचा दर प्रति किमी किमान ४२ रुपये आकारण्यात येत आहे.
  • प्रतिदिवस मालवाहतुकीसाठी ३,५०० रुपये भाडे निश्चित केले आहे.
  • १०१ किमी ते २५० किमीपर्यंत प्रति किमी ४०, तर २५१ किमीच्या पुढे ३८ रुपये प्रति किमी दर आकारण्यात येणार आहेत.
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा