Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांसाठी २३ डिसेंबर अंतिम मुदत; अन्यथा बडतर्फीला सुरूवात

आपल्या मागणी्च्या पुर्ततेसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. गेल्या दीड महिन्याहून अधिक काळ हा संप सुरू आहे.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी २३ डिसेंबर अंतिम मुदत; अन्यथा बडतर्फीला सुरूवात
SHARES

आपल्या मागणी्च्या पुर्ततेसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. गेल्या दीड महिन्याहून अधिक काळ हा संप सुरू आहे. या संपामुळं एसटी महामंडळाचं मोठं नुकसान होत आहे. परिणामी एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. अशातच कामावर रुजू होण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना गुरुवार, २३ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. कामावर रुजू न झाल्यास शुक्रवारपासून २४ डिसेंबर पुन्हा कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.

नियमानुसार निलंबन, बडतर्फीसारख्या कारवाईला सुरुवात होईल, अशी माहिती एसटी महामंडळानं दिली. विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर अद्यापही ठाम आहेत. संपाची नोटीस देणाऱ्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेनं सोमवारी संप मागे घेण्याची घोषणा एसटी महामंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर केली. 

यावेळी निलंबन, बडतर्फी, सेवा समाप्ती अशी कारवाई मागे घेण्यावर चर्चाही झाली. २ दिवसांत कामावर रुजू होण्याचे आवाहनही पत्रकार परिषदेत महामंडळाने केले. महामंडळानं कारवाया मागे घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर मंगळवारी यासंदर्भात परिपत्रक काढलं. त्यानुसार २३ डिसेंबपर्यंत कर्तव्यावर हजर होण्यास सांगण्यात आले आहे. मात्र कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमीच आहे.

एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी २३ डिसेंबर ही अंतिम मुदत असल्याचं सांगितलं. कामावर न परतल्यास शुक्रवारपासून कर्मचाऱ्यांवर पुन्हा कारवाई होईल. त्यामुळं कारवाई होण्यापेक्षा कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याचे आवाहन महामंडळाकडून केलं जात असल्याची माहिती मिळते.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा