Advertisement

टॅक्सीवर लागणार तीनरंगी दिवे, १ फेब्रुवारीपासून होणार अंमलबजावणी

रस्त्यावरून धावणारी टॅक्सी रिकामी आहे की नाही हे प्रवाशांना आता सहजरित्या कळणार आहे. कारण मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या टपावर आता ३ रंगांचे दिवे लावण्यात येणार आहे.

टॅक्सीवर लागणार तीनरंगी दिवे, १ फेब्रुवारीपासून होणार अंमलबजावणी
SHARES

रस्त्यावरून धावणारी टॅक्सी रिकामी आहे की नाही हे प्रवाशांना आता सहजरित्या कळणार आहे. कारण मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या टपावर आता ३ रंगांचे दिवे लावण्यात येणार आहे. परिवहन विभागाच्या या नव्या नियमाची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.

राज्य सरकारने यासंदर्भातील अधिसूचना याआधीच जाहीर केल्याची माहिती वाहतूक आयुक्त शेखर चन्ने यांनी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिली. चन्ने म्हणाले, सरकारच्या अधिसुचनेनुसार, हिरवा, लाल आणि पांढरा अशा ३ रंगाचे एलईडी दिवे टॅक्सींवर लावण्यात येणार आहेत. या दिव्यांच्या रंगानुसार एखादी टॅक्सी भाडं स्वीकारणार की नाही हे प्रवाशांना कळू शकणार आहे. या टॅक्सींना प्रवाशांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाकडे पाहून नव्या ऑटो रिक्षांवरही अशा प्रकारे दिवे लावण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. 

हेही वाचा- मुंबई विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्याने केलीआत्महत्या 

‘या’ रंगाचा अर्थ असा

  • हिरवा - प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी टॅक्सी उपलब्ध
  • लाल - टॅक्सीत प्रवासी आहेत
  • पांढरा - टॅक्सी भाडं स्वीकारण्यास उपलब्ध नाही 

शिवाय या एलईडी दिव्यांवर ‘For Hire’, ‘Hired’ and ‘Off Duty’ असे शब्द इंग्रजीत आणि मराठीत लिहीणे अनिवार्य असणार आहे. 

मुंबई शहरात अंदाजे ४३,५०० काळ्या-पिवळ्या टॅक्सी, तर सुमारे अडीच लाख ऑटो रिक्षा आहेत. तर संपूर्ण राज्यात मुंबईसह ६५,५९१ नोंदणीकृत टॅक्सी आणि ९.७५ लाख नोंदणीकृत ऑटो रिक्षा आहेत. 

यासंदर्भातील प्रस्ताव २०१२ मध्ये मांडण्यात आला होता. त्यावर लोकांच्या सूचना आणि आक्षेप मागवण्यात आल्यानंतर जानेवारी २०१४ मध्ये या प्रस्तावाच्या अंमलबजावणीला वेग आला. त्यानंतर तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या दिव्यांवर इंग्रजीबरोबरच मराठीतही शब्द लिहिण्यात यावेत असा आग्रह धरल्यानंतर हा प्रस्ताव पुन्हा रेंगाळला.

हेही वाचा- सापाच्या नादात झालं अकाऊंट 'साफ' 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा