Advertisement

संचारबंदीमुळं रिक्षा चालकांवर आर्थिक संकट

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रामाणात वाढत आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात संचारबंदी लावले आहेत.

संचारबंदीमुळं रिक्षा चालकांवर आर्थिक संकट
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रामाणात वाढत आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात संचारबंदी लावले आहेत. शिवाय, कडक निर्बंध ही लावले आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी हे निर्बंध लावण्यात आले असले, तरी रिक्षा चालकांवर मोठं आर्थिक संकट ओढावलं आहे.

संचारबंदीतून रिक्षावाहतुकीला वगळण्यात आले असले तरी, प्रवासी नसल्यामुळं रिक्षाचालक हैराण झाले आहेत. दिवसभर वणवण करूनही जेमतेम १०० रुपये कमाईही होत नसल्यानं रिक्षाचे हप्ते कसे फेडायचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न रिक्षाचालकांसमोर पडला आहे.

संचारबंदी लागू होण्यापूर्वी रोज भाड्यातून ५०० ते १००० रुपये मिळत होते. रिक्षाचा गॅस, गाडीचा हप्ता बाजूला काढल्यानंतर ५०० ते ६०० रुपये रिक्षाचालकांच्या पदरात पडत होते. मात्र, सध्या मागच्या वर्षांसारखीच परिस्थिती ओढवल्याने हप्ते कसे भरायचे आणि कुटुंबीयांना कसे पोसायचे, हा प्रश्न रिक्षाचालकांसमोर आहे.

राज्य सरकारनं १४ एप्रिलपासून कडक निर्बंधांसह संचारबंदी लागू केली आहे. मात्र, यातून रिक्षा, टॅक्सी अशा वाहतूक सेवांना वगळण्यात आले होते. ही सार्वजनिक वाहतूक साधनं सुरू राहिल्यामुळं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसंच, रिक्षाचालकांनाही आधार मिळाला होता. मात्र, संचारबंदीमुळं बाजारपेठा, खासगी कार्यालये बंद असल्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतो. तसेच बहुतांश नागरिक खासगी वाहनांनी किंवा अ‍ॅपआधारित टॅक्सीसेवेतून प्रवास करत आहेत. परिणामी रिक्षाच्या प्रवासीसंख्येत कमालीची घट झाली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा