Advertisement

वांद्रे-वर्सोवा सी लिंकला पुढच्या वर्षीचा मुहूर्त


वांद्रे-वर्सोवा सी लिंकला पुढच्या वर्षीचा मुहूर्त
SHARES

मुंबई - वांद्रयावरून वर्सोवाला प्रवाशी-वाहनचालकांना केवळ दहा मिनिटांत यावे यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हाती घेण्यात आलेला वांद्रे-वर्सोवा सी लिंक प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून रखडला आहे. आता मात्र एमएसआरडीसीनं हा प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतलाय. पुढच्या वर्षी पावसाळ्याआधी या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी मुंबई लाईव्हला दिलीय.

काही महिन्यांपूर्वीच प्रकल्पाच्या बांधकामासाठी विनंती प्रस्ताव मागवण्यात आले असून, निविदा प्रक्रिया पुढील चार महिन्यांत पूर्ण करण्यात येणाराय. त्यानुसार पावसाळ्यापूर्वी कामाला सुरुवात करणं शक्य होणार असल्याचंही मोपलवार यांनी स्पष्ट केलंय. या प्रकल्पासाठी निधी कसा उभारता येईल याचाही एमएसआरडीसीकडून विचार सुरू आहे. निधीची कोणतीही अडचण प्रकल्पासाठी भासू देणार नाही. तसंच लवकरात लवकर हा प्सरकल्ल्याप पूर्चंण करणार असा मानस मोपलवार यांनी व्यक्त केला. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणाराय.

असा आहे प्रकल्प

वांद्रे-वर्सोवा सी लिंक

10.1 किमी लांबीचा

6 मार्गिकेचा

अंदाजे खर्च 7000 कोटी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा