Advertisement

चालकाला हृदयविकाराचा झटका; चेंबूरमध्ये बेस्ट बसचा अपघात

चेंबूर पोलीस स्टेशन समोर बसंत पार्क इथं बेस्ट बसला अपघात झाला.

चालकाला हृदयविकाराचा झटका; चेंबूरमध्ये बेस्ट बसचा अपघात
SHARES

मुंबईतील चेंबूर (chembur) परिसरात बेस्ट बसचा अपघात (best bus accident) झाल्याची माहिती समोर येत आहे. या बसचे चालक हरिदास पाटील यांना हृदयविकाराचा झटका आल्याने बस वरील ताबा सुटला व अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बस चालक हरिदास यांना हृदयविकाराचा झटका (heart attack) आल्यानं त्यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

चेंबूर पोलीस स्टेशन (chembur police station) समोर बसंत पार्क इथं बेस्ट बसला अपघात झाला. मंगळवारी सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास बस क्रमांक ३८१ घाटकोपर स्थानक पूर्व येथून टाटा वीज केंद्र चेंबूर येथे जात हा अपघात झाला. बस चालकाचा बसवरील ताबा सुटला व बस फुटपाथवरील भाजीच्या दुकान घुसली व सिग्नलला थांबली.

बसमध्ये १० ते १५ प्रवासी असून, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समजतं. मात्र, बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement