बेस्टच्या लाल रंगाच्या बसचा झाला मेकओव्हर

  CST
  बेस्टच्या लाल रंगाच्या बसचा झाला मेकओव्हर
  मुंबई  -  

  मुंबईच्या बेस्ट बस प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बेस्ट बसेसचं रुप पालटणार आहे. तोट्यात जाणाऱ्या बेस्टला सावरण्यासाठी मुंबईकर प्रवाशांना बेस्टकडे आकर्षित करणं गरजेचं आहे. त्यासाठीच काही महिन्यांपूर्वी मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् च्या विद्यार्थ्यांनी बेस्टच्या बसेसचा लाल रंग बदलण्यात यावा असं सूचवलं होतं. त्यानुसार लाल रंगाच्या बेस्ट बसचा रंग बदलून पांढरा शुभ्र करण्यात आला आहे.

  जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् च्या विद्यार्थ्यांनी प्रायोगिक तत्वावर लाल रंगातील बेस्ट बसला पांढऱ्या शुभ्र रंगात रंगवलं आहे. येत्या काही दिवसांत ही पांढऱ्या रंगातील बेस्ट बस प्रायोगिक तत्वावर रस्त्यांवर धावताना दिसू शकेल.

  बेस्ट बसच्या या नव्या लूकमध्ये केवळ तिचा रंग बदलण्यात आला आहे. बसमध्ये कोणतेही अंतर्गत बदल करण्यात आलेले नाहीत. बेस्टच्या या रंग बदलाला यापूर्वीच बेस्ट कमिटीनं विरोध केला होता. त्यामुळे सध्या केवळ प्रायोगिक तत्वावरच पांढऱ्या रंगातील बेस्ट बस रस्त्यावर चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.