Advertisement

बेस्टच्या मदतीसाठी आलेल्या एसटीच्या गाड्या अस्वच्छ; प्रवासी नाराज

प्रवाशांना त्रास होतो असून, याप्रकरणी गुरुवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

बेस्टच्या मदतीसाठी आलेल्या एसटीच्या गाड्या अस्वच्छ; प्रवासी नाराज
SHARES

कोरोनाच्या (corona) पार्श्वभूमीवर बेस्टनं (best) प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमानं एसटीची (msrtc) मदत घेतली. मात्र, बेस्टच्या ताफ्यात मदतीसाठी आलेल्या एसटीच्या गाड्या (msrtc bus) अस्वच्छ असल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी प्रवाशांना त्रास होतो असून, याप्रकरणी गुरुवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

सर्वसामान्य प्रवाशांना लोकल (mumbai local) प्रवासाची परवानगी नसल्यानं लॉकडाऊनमध्ये बेस्ट व एसटी महामंडळानं सेवा दिली. हळूहळू बेस्टच्या गाड्यांना वाढलेली गर्दी, बसची अपुरी संख्या, त्यामुळं तासन्तास बसची प्रतीक्षा करण्यास लागत असल्यानं बेस्टनं एसटीच्या गाड्या ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १ हजार गाड्या दाखल झाल्या आहेत. मात्र, एसटी महामंडळाकडून बेस्टच्या ताफ्यात दिलेल्या गाड्या अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले आहे.

या गाड्यांची साफसफाई होत नसल्यानं प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. याबाबत बेस्ट समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. महापालिकेतील (bmc) विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी अस्वच्छ एसटीमुळं प्रवासी नाराज असल्याचं म्हटलं. त्यांची स्वच्छता करूनच त्या ताफ्यात दाखल करण्याची मागणी केली. या बस प्रत्येक किलोमीटरमागे ७५ रुपये या दरानं भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. प्रासंगिक करारावर बस ४५ रुपये किलोमीटर दरानं दिली जाते. त्यामुळं एसटीच्या बस एवढ्या महाग दरानं घेताना त्याची स्वच्छताही तशीच ठेवणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

बैठकीत काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनीही हाच मुद्दा मांडत प्रवाशांच्या सेवेत येणाऱ्या एसटी स्वच्छ असल्या पाहिजेत, अशी मागणी केली. यावर बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांनी सामान्यांना लोकल प्रवेश नसल्यानं व वाहतुकीत बेस्टच्या गाड्या अपुऱ्या पडत असल्यानं  एसटीची मदत घेण्यात आली आहे. मात्र येणाऱ्या गाड्या अस्वच्छ असल्यानं त्याची दखल घेऊन एसटी महामंडळाला याबाबत निदर्शनास आणून दिलं जाईल, अशी माहिती दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा