Advertisement

बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ
SHARES

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सर्वासामान्यांचा लोकल प्रवास हा बंद असल्यानं बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. गेल्या सव्वा महिन्यात बेस्टच्या प्रवासी संख्येत तीन लाख ४७ हजार प्रवाशांची भर पडली आहे. वाढत जाणारी प्रवासी संख्या लक्षात घेता विलंब झालेल्या भाडेतत्त्वावरील बसगाड्या लवकरात लवकर ताफ्यात दाखल करण्याचा प्रयत्न बेस्ट प्रशासन करीत आहे.

ऑगस्टअखेपर्यंत बेस्टच्या ताफ्यात १०० नवीन बसगाड्या दाखल होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या लाटेमुळं प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आले. बेस्ट बसमधून फक्त ५० टक्के  प्रवासी वाहतुकीचीच परवानगी होती. जसजशी करोना रुग्णांची संख्या कमी झाली आणि सरकारी तसेच खासगी कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाढ झाली, त्यानुसार उपक्र माने पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी मुंबई पालिका व राज्य सरकारकडं मागितली होती. त्यानुसार परवानगी देण्यात आली. त्यानंतर, ७ जून २०२१ पासून बेस्ट बस पूर्ण प्रवासी क्षमतेनं धावू लागल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, ७ जूनला १८ लाख १३ हजार प्रवाशांनी बेस्ट बसमधून प्रवास केला होता आणि उपक्रमाला १ कोटी ५६ लाख रुपये महसूल मिळाला होता. गेल्या आठवडय़ात प्रवासी संख्या २१ लाख ६० हजार ५८६ पर्यंत पोहोचली आणि एक कोटी ८६ लाख रुपये महसूल मिळाला आहे. प्रवासी संख्या आणखी वाढण्याचीही शक्यता लक्षात घेता आधीच उशीर झालेल्या भाडेतत्त्वावरील बसगाड्या ताफ्यात दाखल करण्यासाठी बेस्टची धडपड सुरू आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा