Advertisement

बेस्टची ‘दिवाळी सुपर सेव्हर ऑफर’, 9 रुपयांत 5 फेऱ्यांचा लाभ!

बेस्ट उपक्रमाने डिजिटल बस प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी दिवाळी योजना जाहीर केली आहे.

बेस्टची ‘दिवाळी सुपर सेव्हर ऑफर’, 9 रुपयांत 5 फेऱ्यांचा लाभ!
SHARES

बेस्ट उपक्रमाने डिजिटल बस प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी दिवाळी योजना जाहीर केली आहे. याअंतर्गत कोणत्याही मार्गावर फक्त ९ रुपयांत ५ प्रवासी फेऱ्यांचा लाभ घेता येणार आहे. ही योजना ७ दिवसांसाठी वैध आहे. अधिकाधिक मुंबईकरांना या सुविधांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हाच या योजनेचा उद्देश आहे

ऑफरचा लाभ कसा घ्यावा?

फक्त बेस्ट चलो अॅप डाउनलोड करा आणि अॅपच्या बस पास पर्यायात जावून ऑफर शोधा. "दिवाळी ऑफर" निवडल्यानंतर तुमचा तपशील प्रविष्ट करा आणि UPI डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे अथवा नेट बँकिंगद्वारे ९/- रु चा ऑनलाइन भरणा प्रदान करा.

एकदा तुम्ही बसमध्ये चढल्यानंतर प्रवास सुरु करण्यासाठी मोबाईल मध्ये 'फेरी सुरु करा' असे बटण दाबा. प्रवास वैधतेसाठी तिकीट मशीनजवळ तुमचा फोन टॅप करा. यशस्वी वैधतेनंतर तुम्हाला ॲपवरच तुमच्या प्रवास फेरीची डिजिटल पावती मिळेल.

संपूर्ण व्यवहार हा विनारोख आणि कागदरहित असेल ! सदर योजना ऑक्टोबर २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत प्रवाशांसाठी उपलब्ध असेल.

पात्र वापरकर्ते 

ज्यांनी यापूर्वी कधीही बेस्ट चलो अँपवर सुपर सेव्हर योजना किंवा डिजिटल तिकीट पूर्वी कधीच खरेदी केलेली नाही, अशा सर्व वापरकर्त्यासाठी सदर योजना उपलब्ध आहे.

ऑफरचे फायदे

या योजनेनुसार जे वापरकर्ते पहिल्यांदा डिजिटल प्रदान करत आहेत ते कोणत्याही बसमार्गावर ७ दिवसांच्या कालावधीत ५ प्रवासी फेन्या करू शकतात. ही योजना विमानतळ मार्ग, हॉप-ऑन हॉप-ऑफ बस या विशेष बससेवा वगळून सर्व वातानुकूलित आणि विना वातानुकूलित बसेससाठी लागू असेल.

आतापर्यंत ३० लाखांहून अधिक वापरकर्त्यांनी बेस्ट चलो अॅप डाउनलोड केले आहे. त्यापैकी २५% पेक्षा जास्त बस प्रवासी त्याचा दररोज वापर करीत आहेत. प्रत्येक डिजिटल बसफेरी प्रवाशांसाठी सुखद प्रवासाचा अनुभव देते. त्याबरोबरच रोख रक्कम हाताळणीचा त्रास आणि तिकीट छपाईचा खर्च वाचतो.

बेस्टने अलीकडेच ३५ लाख दैनंदिन प्रवाशांचा आकडा गाठला असून अनेक वर्षातील सर्वात जास्त दैनंदिन प्रवासी संख्येचा उच्चांक निर्माण केलेला आहे जो कोविड पूर्व काळापेक्षा ९% ने जास्त आहे.

बेस्टने यापूर्वी स्वातंत्र्यदिनी १/- रुपयाची प्रवास योजना तसेच गणेश उत्सव नवरात्री आणि दसरा या दिवशी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत ज्याचा लाखो मुंबईकरांनी लाभ घेवून १२ लाखांहून अधिक डिजिटल प्रवासी फेन्या अनुभवल्या.



हेही वाचा

पश्चिम रेल्वेनेकडून गुड न्यूज! लोकलमध्ये महिलांचे डबे वाढवले

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा