Advertisement

कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल बेस्टचा 'या' ऑर्गनायझेशनकडून गौरव

कोरोनाकाळात बजावलेल्या कामगिरीबद्दल मुंबईच्या बेस्ट प्रशासनाचा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनकडून (आयएलओ) गौरव करण्यात आला आहे.

कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल बेस्टचा 'या' ऑर्गनायझेशनकडून गौरव
SHARES

कोरोनाकाळात बजावलेल्या कामगिरीबद्दल मुंबईच्या बेस्ट प्रशासनाचा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनकडून (आयएलओ) गौरव करण्यात आला आहे. 'आयएलओ'तर्फे नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या मासिकात 'हेल्थ अँड वेलनेस अ‍ॅट वर्क' या लेखात बेस्ट प्रशासनानं कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी केलेल्या कामगिरीचा उल्लेख करण्यात आला आहे.

बेस्ट प्रशासनानं कोरोनावर मात करण्यासाठी कोरोना प्रतिसाद दल उभारून सर्व कर्मचाऱ्यांची प्रतिजैविक चाचणी सुरू केली. तसंच रुग्णांची तपासणी करण्यासाठी तंत्रज्ञानानं परिपूर्ण अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली. त्यातून रुग्ण बरं होण्याचं प्रमाण वाढल्याचं या लेखात नमूद करण्यात आलं आहे.

मुंबईत मार्च महिन्यात कोरोनानं प्रवेश केला. तेव्हापासून मुंबईत लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. या लॉकडाऊनच्या काळात सर्व वाहतूक सुविधांसह सर्वच उद्योगधंदे व्यवसाय बंद होते. परंतू, या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सुविधा पुरविण्यासाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून सेवा दिली.   

संबंधित विषय
Advertisement