'बेस्ट'मध्ये खाजगीकरणाला सुरुवात?

  Mumbai
  'बेस्ट'मध्ये खाजगीकरणाला सुरुवात?
  मुंबई  -  

  मुंबई -  बेस्ट उपक्रम दिवसेंदिवस तोट्यात चाललेला आहे. तोट्यातील या बेस्टला नफ्यात आणण्यासाठी कृती आराखडा तयार केला जातोय. असे असताना बेस्टच्या वाढीव खर्चांना कात्री लावण्यासाठी आता चक्क खासगी बसेस भाड्यावर घेऊन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तब्बल शंभर बसेस भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. भाडेतत्वावरील खासगी बसेसची सुविधा घेऊन बेस्टने खासगीकरणाच्या दिशेना पाऊल टाकले असून या खासगीकरणाच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव बेस्ट समितीपुढे मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे.

  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार टीडीएलआरची रक्कम परिवहन विभागाकडे हस्तांतरीत करण्यात येत नसल्यामुळे उपक्रमाचा परिवहन विभाग हा आथिर्कदृष्ट्या बळकट होऊ शकत नाही. त्यामुळे नवीन बसगाड्या खरेदी करण्यासाठी भांडवली गुंतवणूक करणे शक्य नाही. म्हणून बसगाड्या भाड्याने घेतल्यास पर्यायाने बसगाड्यांसाठी मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक न करता उपक्रमाला नवीन बसगाड्या सुरु करणे शक्य होईल 

  - जगदीश पाटील, महाव्यवस्थापक, बेस्ट

  बेस्ट उपक्रमातील परिवहन विभाग तोटयात चाललेला असून पैसे नसल्यामुळे कामगारांचे पगारही वेळेवर दिले जात नाहीत. त्यामुळे बेस्टला नफ्यात आणण्यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. परिवहन विभागाकडून उत्पन्नाचे कोणतेही नवीन स्त्रोत नसल्यामुळे बँकांनी कर्ज देण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे महापालिकेकडून आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे. कृती आराखड्यानंतर बेस्टला अनुदान देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. चालक आणि वाहकांवरील खर्चांबरोबरच इंधन तसेच बसेसच्या देखभालीसाठी येणारा अवास्तव खर्च लक्षात भाडेतत्त्वर खासगी बसेसची सेवा घेण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. याचे पहिले पाऊल म्हणून 100 बसेस भाडेतत्वावर घेत खासगीकरणाच्या दिशेने टाकले आहे.


  बेस्टचा  किलोमीटर मागील खर्च - 51 रुपये

  खासगी कंपनीला देणार प्रती कि.मी खर्च - 61 रुपये


  बेस्ट उपक्रमाने पाच वर्षांच्या कालावधीमध्ये 100 एक मजली बिगर वातानुकुलित बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. 4 हजार 250 किलोमीटर प्रति महिना यासाठी 50 बसेस आणि प्रति महिना 5000  किलोमीटर प्रवासासाठी 50 बसेस अशाप्रकारे निविदा मागवल्या होत्या. यामध्ये प्रसन्ना पर्पल मोबिलिटी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी दोन्ही वर्गातील बसेस उपलब्ध करून देण्याच्या कामांसाठी पात्र ठरली आहे. यामध्ये प्रति किलोमीटरसाठी 61.41 एवढा रुपयांची बोली लावत काम मिळवले आहे. विशेष म्हणजे एकाच कंपनीला शंभर बसेस उपलब्ध करून देण्याचे कंत्राट मिळू नये म्हणून दोन टप्प्यात  निविदा मागवल्या होत्या. परंतु दोन्ही निविदांमध्ये एकच कंपनी पात्र ठरली आहे. या कंपन्यांच्यावतीने बसेससह चालक आणि इंधन पुरवले जाईल तसेच त्यांची देखभाल केली जाईल. केवळ त्या बसेसवर बेस्टचा वाहक हा तिकीट देण्यासाठी असेल,असेल. त्यामुळे बेस्टच्या चालकासह इंधन व देखभालीचा खर्च बेस्ट कमी करणार आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात 100 नवीन बसेसची खरेदी करण्यासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद केली होती. परंतु  या नवीन बसेसची खरेदी करण्यात आली नसल्यामुळे यासाठीचा निधी वाया गेला आहे.

  हे एकप्रकारे खासगीकरणच असून बेस्टच्या या आर्थिक स्थितीला सत्ताधारी शिवसेना आणि भाजपा जबाबदार आहे. बेस्टला प्रत्येक किलोमीटरसाठी ५१ रुपयांचा खर्च येतो. पण त्या तुलनेत खासगी बसेसना प्रत्येक किलोमीटरसाठी ६१ रुपये मोजले जाणार आहेत. म्हणजे दहा रुपये अधिक दिले जाणार आहेत. त्यामुळे खासगी कंपन्याला लुटण्याची संधीच दिली जात आहे.

  रवी राजा, बेस्ट समिती सदस्य

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.