Advertisement

बेस्टच्या आर्थिक मदतीचा निर्णय २९ मार्चलाच


बेस्टच्या आर्थिक मदतीचा निर्णय २९ मार्चलाच
SHARES

मुंबई - तोट्यात चाललेल्या बेस्टला महापालिकेच्या वतीने आर्थिक मदत केली जाईल. परंतु आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्टला, राज्य आणि केंद्र सरकारकडूनच मदत होणे आवश्यक आहे. यासाठी सर्व गटनेत्यांशी चर्चा करून लवकरच केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी केली जाईल, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

बेस्टला आर्थिक मदत करण्यासाठी कायमस्वरुपी कृती आराखडा तयार करण्यात येत असून हा आराखडा सोमवारीही सादर न करता बेस्टबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गटनेत्यांची सोमवारी बैठक पार पडली. तोट्यात चालेलेल्या बेस्टला आर्थिक मदत करण्यासाठी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली दुसरी सभाही निष्फळ ठरली. त्यामुळे आता ठोस आराखडा बनवल्यानंतरच येत्या २९ मार्चला अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

तात्पुरत्या स्वरुपात तसेच बिनव्याजी निधी देण्याच्या निर्णयावर एकमत झालेले नाही. महापालिकेकडून दिला जाणारा निधी हा परत वळता करणे आवश्यक आहे, त्यामुळे उत्पन्न आणि खर्च याचा ठोस आराखडाच तयार करण्यास बेस्टला सांगितले आहे. तो आराखडा अद्यापही तयार नसल्यामुळे बैठक पुढे ढकलली असल्याचे महापौरांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा