Advertisement

चेंबूरजवळ ओव्हरहेड वायर तुटली, हार्बरची वाहतूक विस्कळीत


चेंबूरजवळ ओव्हरहेड वायर तुटली, हार्बरची वाहतूक विस्कळीत
SHARES

गोवंडी ते चेंबूर रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी ११.१५ वाजता ओव्हरहेड वायर तुटल्याने सकाळच्या सुमारास हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली. यामुळे सीएसटीहून पनवेलकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे कोलमडली. या प्रकाराने नेहमीप्रमाणे आॅफिसला जाण्यासाठी घरातून निघालेल्या चाकरमान्यांना एेन गर्दीच्या वेळेस मनस्ताप सहन करावा लागला.

ओव्हरहेड वायर तुटल्याने पनवेल ते गोवंडीतील वाहतूक विस्कळीत झाली असली, तरी चेंबूर ते सीएसटी वाहतूक रडतखडत सुरू आहे. परंतु सकाळच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले.

सद्यस्थितीत हार्बर मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. या खोळंब्यामुळे सकाळच्या वेळेस किती गाड्या रद्द करण्यात आल्या, या संदर्भातील अधिकृत माहिती अद्याप मध्य रेल्वेकडून देण्यात आलेली नाही.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा