Advertisement

कोरोनामुळं उपनगरीय रेल्वेचं इतकं नुकसान

मुंबईतील अनेकांना या कोरोनाच्या काळात आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागलं. अशातच वाहतूक सेवेलाही मोठा बसल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोनामुळं उपनगरीय रेल्वेचं इतकं नुकसान
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरात मार्च माहिन्यात कोरोनानं प्रवेश केला. या कोरोनामुळं मुंबईतील दुकांन, व्यवसाय, उद्योगधंद्यांसह वाहतूक सेवाही बंद पडली. मुंबईतील अनेकांना या कोरोनाच्या काळात आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागलं. अशातच वाहतूक सेवेलाही मोठा बसल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळं पश्चिम आणि मध्य उपनगरीय रेल्वेला आतापर्यंत तब्बल १ हजार २० कोटी रुपयांच्या प्रवासी उत्पन्नावर पाणी सोडावं लागलं आहे. 

मागील ८ महिन्यांत या दोन्ही विभागांच्या तिजोरीत अवघे ५२ कोटी रुपये जमा झाल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनामुळं २२ मार्चपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली. तब्बल ३ हून अधिक महिने लोकल सेवा बंद ठेवण्यात आली होती. याआधी बॉम्ब स्फोट अथवा कोणती मोठी दुर्घटना घडल्यास लोकल सेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र, प्रथमच एका व्हायरसमुळं लोकल सेवा बंद ठेवण्यात आली.

लोकल सेवा बंद ठेवल्यानं अनेक नोकरवर्गाचं मोठं आर्थिक नुकसानं झालं. अनेकांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावं लागलं. तर काहींना कमाईचा नवा मार्ग शोधला. मात्र, याकाळात वाहतूक सेवा बंद असल्याचा त्यांना मोठा फटका बसला. त्यामुळं अत्यावश्यक सेवेतील होणार गैरयोय लक्षात घेत ३ महिन्यांनंतर लोकल सेवा सुरू करण्यात आली. सुरुवातीला फक्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच लोकल धावत होती. त्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता प्रवासाची मुभा देण्यात आली. 

सध्यस्थितीत विविध श्रेणीतील कर्मचारी आणि सर्व महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल मात्र अद्याप खुली झालेली नाही. त्यामुळं उपनगरीय मार्गावर सेवा देताना मध्य आणि पश्चिम रेल्वेला मोठ्या तोट्याला सामोरं जावं लागत आहे. या तोट्यानं आता १ हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.

दरवर्षी एप्रिल ते नोव्हेंबपर्यंत मध्य रेल्वेला उपनगरीय सेवेतून साधारण ५०२ कोटी रुपये प्रवासी उत्पन्न मिळतं. यंदा फक्त २२ कोटी रुपये उत्पन्न मिळालं असून, ४८० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कर्जत, खोपोली, हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर मिळून ९० टक्क्यांपेक्षाही अधिक लोकल फेऱ्या सुरू झाल्या आहेत. परंतु, प्रवासी संख्या ६ लाखच आहे.

पश्चिम रेल्वेलाही मागील ८ महिन्यांत ३० कोटी ६५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळालं. तर ५४० कोटी ९ लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावं लागलं. पश्चिम रेल्वे मार्गावरील ६ लाख ४२ हजार ५०१ प्रवासी प्रवास करत असून ९० टक्क्यांपेक्षा अधिक लोकल फेऱ्या सध्या धावतात.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सध्या दररोज २७८१ लोकल फेऱ्या धावतात. यात मध्य रेल्वेवरील १५८० (लॉकडाऊनपूर्वी १७०० पेक्षा जास्त फेऱ्या) आणि पश्चिम रेल्वेवरील १२०१ फेऱ्यांचा (लॉकडाऊनपूर्वी १३६७ फेऱ्या) समावेश आहे. या दोन्ही मार्गावर दर दिवशी एकूण ८० लाख प्रवासी प्रवास करत होते. आता हीच संख्या १२ लाखांच्या आसपास आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा