Advertisement

मध्य रेल्वेच्या लोकल फेऱ्यांच्या संख्येत वाढ


मध्य रेल्वेच्या लोकल फेऱ्यांच्या संख्येत वाढ
SHARES

लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्यानं त्यामुळं अत्यावश्यक प्रवाशांसाठी सोमवारपासून २२५ फेऱ्या वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. या लोकलमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा असणार आहे. या निर्णयामुळे मुंबई लोकलवरील अत्यावश्यक लोकलफेऱ्यांची एकूण संख्या १४००हून अधिक झालेली आहे. राज्य सरकारने पाठवलेल्या पत्रानुसार, मध्य रेल्वेनं लोकलफेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेवरील मुख्य मार्गावर एकूण ४९९ फेऱ्या सुरू करणार आहेत. यात धीम्या मार्गावर ३०९ आणि जलद मार्गावर १९० फेऱ्यांचा समावेश आहे. हार्बर मार्गावरील १८७ आणि ट्रान्स हार्बर मार्गावर २० फेऱ्या धावणार आहेत. राज्य सरकारने सर्व महिलांना प्रवास करण्याची मुभा दिली असली तरी महिला प्रवाशी प्रतीक्षेत आहेत. त्याशिवाय या महिला प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली.

राज्य सरकारने सर्व महिला प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा दिलेली आहे. तथापि अद्याप रेल्वे मंडळाकडून आवश्यक परवानगी मिळालेली नाही. मुंबई लोकलवरील सुमारे २२ लाख महिलांना प्रवासाची मुभा दिल्यानंतर गर्दी नियंत्रण आणि कोविड नियमांचं पालन करण्यासाठी रेल्वे आणि राज्य सरकारची संयुक्त बैठक होणे बाकी आहे.

सध्या मध्य रेल्वेवर ४८१ लोकल धावत असून, वाढीव फेऱ्यामुळे मध्य रेल्वेवरील एकूण लोकलची संख्या ७०६ पर्यंत पोहोचली आहे. पश्चिम रेल्वेवर सध्या ७०० लोकल फेऱ्या धावत आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा