Advertisement

मध्य रेल्वे राज्यात आणखी विशेष गाड्या चालवणार


मध्य रेल्वे राज्यात आणखी विशेष गाड्या चालवणार
SHARES

मध्य रेल्वेनं प्रवाशांच्या सोयीसाठी राज्यभरात विशेष गाड्या चालवत आहेत. यामध्ये आता वाढ करण्यात येणार असून येत्या रविवारपासून राज्यात आणखी ८ जोड्या विशेष गाड्या चालविणार आहे.  या विशेष गाड्या पूर्णपणे आरक्षित असणार आहेत.

विशेष गाड्या

मुंबई-कोल्हापूर विशेष दैनिक 

01029 विशेष ट्रेन दि. १३ रोजी पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज सुटेल आणि त्याच दिवशी कोल्हापूरला पोहोचेल.

01030 विशेष गाडी दि. १२ रोजी कोल्हापूर येथून दररोज सुटेल आणि त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल.

थांबे आणि वेळ : कराड, कर्जत, तारगाव, टाकरी, वालिवडे व घोरपडी थांबे वगळता नियमित गाडी क्रमांक 11029/ 11030 कोयना एक्स्प्रेस प्रमाणे. 

मुंबई-लातूर सुपरफास्ट विशेष आठवड्यातून ४ दिवस

02207 सुपरफास्ट विशेष गाडी दि.११ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि रविवारी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी लातूर येथे पोहोचेल.

02208 सुपरफास्ट विशेष दि. १२ रोजी लातूर येथून दर सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी पोहोचेल.

थांबे आणि वेळ : लोणावळा, मुरुड आणि हारंगुल थांबे वगळता नियमित गाडी क्रमांक 22107/22108 लातूर सुपरफास्ट एक्सप्रेस प्रमाणे.

पुणे-नागपूर वातानुकूलित विशेष साप्ताहिक 

01417 विशेष वातानुकूलित साप्ताहिक ट्रेन दि. १५ रोजी गुरुवारी पुणे येथून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी नागपूरला पोहोचेल. 

01418 विशेष वातानुकूलित साप्ताहिक दि. १६ रोजी नागपूर येथून प्रत्येक शुक्रवारी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पुण्याला पोहोचेल.

थांबे आणि वेळ : नियमित गाडी क्रमांक 11417/11418 हमसफर वातानुकूलित एक्स्प्रेस प्रमाणे.

पुणे-अजनी विशेष वातानुकूलित साप्ताहिक 

02239 विशेष वातानुकूलित साप्ताहिक ट्रेन दि. १७ रोजी दर शनिवारी पुण्याहून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी अजनीला पोहोचेल.

02240 विशेष वातानुकूलित  साप्ताहिक दि. १८ रोजी अजनी येथून दर रविवारी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पुण्याला पोहोचेल.

थांबे आणि वेळ : नियमित ट्रेन क्रमांक 22139/22140 वातानुकूलित एक्स्प्रेस प्रमाणे.

पुणे-अमरावती वातानुकूलित विशेष साप्ताहिक 

02117 विशेष वातानुकूलित साप्ताहिक ट्रेन दि. १४ रोजी दर बुधवारी पुण्याहून सुटेल आणि दुस-या दिवशी अमरावतीला पोहोचेल.

02118 विशेष वातानुकूलित  साप्ताहिक दि. १५ रोजी अमरावती येथून दर गुरुवारी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पुण्याला पोहोचेल.

थांबे आणि वेळ : नियमित ट्रेन क्रमांक 22117/22118 सुपरफास्ट वातानुकूलित एक्स्प्रेस प्रमाणे. 

अजनी-पुणे विशेष  वातानुकूलित साप्ताहिक 

02224 विशेष वातानुकूलित  साप्ताहिक दि. १३ रोजी अजनी येथून दर मंगळवारी सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी पोहोचेल.

02223 विशेष वातानुकूलित साप्ताहिक ट्रेन दि. १६ रोजी पुण्याहून प्रत्येक शुक्रवारी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी अजनीला पोहोचेल.

थांबे आणि वेळ :  नियमित गाडी क्रमांक 22123/22124 वातानुकूलित सुपरफास्ट एक्स्प्रेस प्रमाणे.

श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर - गोंदिया विशेष दैनिक 

01039 विशेष दि. ११ रोजी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरहून दररोज सुटेल आणि दुसर्‍या दिवशी गोंदियाला पोहोचेल. 

01040 विशेष ट्रेन दि. १३ रोजी गोंदिया येथून दररोज सुटेल आणि दुसर्‍या दिवशी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला पोहोचेल.

थांबे आणि वेळ : सेवाग्राम, चांदूर, जलंब, पुणतांबा, जरंडेश्वर, तारगाव, मसूर, भवानी नगर, टाकरी आणि वालिवडे थांबे वगळता नियमित रेल्वे क्रमांक 11039/11040 महाराष्ट्र एक्स्प्रेस प्रमाणे. 

मुंबई- हजूर साहिब नांदेड विशेष दैनिक 

01141 विशेष दि. ११ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज प्रस्थान करेल व दुसर्‍या दिवशी हजुर साहिब नांदेडला पोहोचेल.

01142 विशेष दि. १२ रोजी हजुर साहिब नांदेड येथून दररोज रवाना होईल आणि दुसर्‍या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे : दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, लासलगाव, मनमाड, नगरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी आणि पूर्णा.

आरक्षण

01029/01030 विशेष, 02207/02208 सुपरफास्ट विशेष, 02224/02223 वातानुकूलित विशेष, 01039 आणि 01141 विशेष गाड्यांचे आरक्षण दि. ९.१०.२०२० पासून सुरू होतील;  01417/ 01418, 02117/02118 आणि 02239/02240 विशेष वातानुकूलित गाड्यांचे आरक्षण  दि. ११.१०.२०२० पासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि  www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होतील. केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाशांना या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात येईल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा