Advertisement

मध्य रेल्वे मार्गावर अपघात; एकाचा मृत्यू, ३ कामगार जखमी


मध्य रेल्वे मार्गावर अपघात; एकाचा मृत्यू, ३ कामगार जखमी
SHARES

रेल्वे रूळ दुरुस्त करणारी मशिन रुळावरून घसरून झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर ३ जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहेत. या अपघातानंतर मध्य रेल्वेची अंबरनाथहून कर्जतच्या दिशेनं जाणारी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

अंबरनाथ-बदलापूर दरम्यान मंगळवारी रात्री हा अपघात झाला. वाहतूक पूर्ववत होण्यास वेळ लागणार असल्यानं प्रवाशांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे.

त्यात रेल्वेचे ३ कामगार जखमी झाले व एकाचा मृत्यू झाला. ही मशिन बाजूला करण्याचं काम सुरू असून त्यासाठी २ ते ३ तास लागणार आहेत. त्यानंतरच रेल्वे वाहतूक पूर्ववत होईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा