इगतपुरीतील कामासाठी मध्य रेल्वेकडून ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर शुक्रवार १२ ते रविवारी १४ ऑक्टोबरपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. हा ब्लॉक सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ पर्यंत असेल. ब्लॉक दरम्यान लांब पल्ल्यांच्या काही गाड्या रद्द केल्या जातील.

SHARE

मध्य रेल्वेनं इगतपुरी येथे यार्ड रिमॉडलिंगप्रमाणेच नवीन रिले इंटरलॉकिंग प्रणाली अंतर्भुत करण्याचं काम हाती घेतलं आहे. या कामासाठी मध्य रेल्वे मार्गावर शुक्रवार १२ ते रविवारी १४ ऑक्टोबरपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. हा ब्लॉक सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ पर्यंत असेल. ब्लॉक दरम्यान लांब पल्ल्यांच्या काही गाड्या रद्द केल्या जातील.


गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

  • एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस सकाळी १०.५५ ऐवजी दुपारी १ वाजता सुटेल
  • एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस सकाळी ११.१० ऐवजी दुपारी १.४५ वाजता सुटेल
  • सीएसएमटी-पटना सुविधा एक्स्प्रेस सकाळी ११.५ ऐवजी दुपारी १.३० वाजता सुटेल
  • दादर-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस दुपारी २ ऐवजी दुपारी २.५० वाजता सुटेल
  • एलटीटी-कझिपेट एक्स्प्रेस सकाळी ११.३० ऐवजी दुपारी २.०० वाजता सुटेल
  • पनवेल-गोरखपुर एक्स्प्रेस संध्याकाळी ५.५० ऐवजी रात्री ९.०० वाजता सुटेल
संबंधित विषय
ताज्या बातम्या