Advertisement

मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम मार्गावर जम्बोब्लाॅक


मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम मार्गावर जम्बोब्लाॅक
SHARES

मुबंई - रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी-बांद्रा स्थानकांदरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. मांटुगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ३.१५ वाजेपर्यत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लाॅकदरम्यान सकाळी ९.३८ ते दुपारी २.५४ वाजेपर्यत सीएसटीहून सुटणारी डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा ते मुलुंड स्थानका दरम्यान डाउन धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहे.

ठाण्याहून सुटणारी अप जलद मार्गावरील लोकल जलद/सेमी जलद गाड्यांना सकाळी १०.४६ ते दुपारी ३.१८ वाजेपर्यत मुलुंड, भांडुप, विक्रोली, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे. तसेच ब्लाॅकदरम्यान सीएसटीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या धिम्या मार्गावरील सर्व लोकल गाड्या सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यत आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने धावणार आहेत. तसेच मुंबईत येणाऱ्या सर्व मेल-एक्स्प्रेस गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत.

हार्बर रेल्वे

हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी आणि बांद्रा स्थानकांदरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यत दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. सकाळी११.२१ ते दुपारी ४.३९ वाजेपर्यंत सीएसटी ते वाशी, बेलापुर, पनवेल या अप आणि डाउन मार्गावरील तर सीएसटी ते बांद्रा-अंधेरी दरम्यानची अप आणि डाउन मार्गावरील वाहतुक सकाळी १०.३८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यत बंद असणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोईसाठी कुर्ला स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून पनवेलसाठी स्पेशल लोकल चालवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गाने प्रवास करू शकतात.

पश्चिम रेल्वेचा जम्बोब्लाॅक

पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रुज ते माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लाॅकदरम्यान सांताक्रुज ते माहिम स्थानकांदरम्यानची अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहे. तर अप आणि डाऊन मार्गावरील काही लोकल ट्रेन रद्द करण्यात येणार आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा