Advertisement

खूशखबर! गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या

यंदा मध्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी 132 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या मुंबई ते पुणे, कारमाळी, सावंतावडी, रत्नागिरी, पेडणेच्या दरम्यान धावणार आहे. त्यामुळे कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी सोय होणार आहे. या सर्व गाड्यांचे आरक्षण 30 जून 2018 पासून सुरू होणार आहे.

खूशखबर! गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या
SHARES

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक खूशखबर आहे. यंदा मध्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी 132 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या मुंबई ते पुणे, कारमाळी, सावंतावडी, रत्नागिरी, पेडणेच्या दरम्यान धावणार आहे. त्यामुळे कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी सोय होणार आहे. या सर्व गाड्यांचे आरक्षण 30 जून 2018 पासून सुरू होणार आहे.

या विशेष गाड्यांचे आरक्षण विशेष शुल्कायसह सर्व पीआरएस केंद्र आणि वेबसाइट www.irctc.co.in वर करता येईल. या गाड्यांचे सामान्य द्वितीय श्रेणी कोच अनारक्षित स्वरुपात चालवण्यात येतील.


छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस - सावंतवाडी रोड (आठवड्यात 6 दिवस) विशेष

  • गाडी क्रमांक - 01001
  • कधी धावणार? 5 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर (गुरूवार सोडून)
  • किती वाजता रात्री 12.20 मिनिटांनी
  • कधी पोहचणार? त्याच दिवशी 14.10 वाजता


सावंतवाडी - सीएसटीएम

  • गाडी क्रमांक - 01002
  • कधी धावणार - 5 सप्टेंबर 2018 पासून 30 सप्टेंबर 2018 पर्यंत (गुरूवार सोडून)
  • किती वाजता - दुपारी 3 वाजता
  • कधी पोहचणार - दुसऱ्या दिवशी दुपारी 3.40 वाजता

या ठीकाणी असतील थांबे - दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावरडे, अरावली रोड, संगमेश्व:र रोड, रत्नागिरी, अडावली, विलावडे, राजापुर रोड, वैभववाडी रोड, नांदगांव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झराप

या गाडीला 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 10 शयनयान श्रेणी, 6 सामान्यी द्वितीय श्रेणी चे डबे असतील


सीएसटीएम - सावंतवाडी रोड

  • गाडी क्रमांक - 01007
  • कधी धावणार? - 6 सप्टेंबर पासून 27 सप्टेंबर (प्रत्ये़क गुरूवारी )
  • वेळ - रात्री 12.20 वाजता
  • कधी पोहचणार - त्याच दिवशी दुपारी 2.10 वाजता
  • थांबे - कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झरप


सावंतवाडी - सीएसटीएम

गाडी क्रमांक - 01008
कधी धावणार - 6 सप्टेंबर 2018 पासून 27 सप्टेंबर 2018 पर्यंत (प्रत्ये़क गुरूवारी )
किती वाजता - दुपारी 3 वाजता
कधी पोहचणार - दुसऱ्या दिवशी दुपारी 3.40 वाजता

या ठीकाणी असतील थांबे - दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावरडे, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड

या गाडीला 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 10 शयनयान श्रेणी, 6 सामान्यन द्वितीय श्रेणी चे डबे असतील


सीएसटीएम - रत्नागि‍री -पनवेल

  • गाडी क्रमांक 01033
  • कधी धावणार? - 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दररोज
  • वेळ - सकाळी 11.30 वाजता
  • कधी पोहचणार? - त्याच दिवशी रात्री 10.00 वाजता
  • थांबे - दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळून, सावरडे, अरावली रोड आणि संगमेश्वठर रोड


रत्नागिरी-पनवेल

  • गाडी क्रमांक 01034
  • कधी धावणार? - 5.स्पटेंबर ते 15 सप्टेंबर.2018 पर्यंत
  • वेळ - रात्री 10.50 वाजता
  • कधी पोचणार? - दुसऱ्या दिवशी सकाळी 07.15 वाजता
  • थांबे - संगमेश्वर रोड, अरावली रोड, सावरडे, चिपळूण, खेड, वीर, माणगांव आणि रोहा

या गाडीला 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 10 शयनयान श्रेणी, 6 सामान्यन द्वितीय श्रेणी डबे असतील.


पनवेल-सावंतवाडी रोड

  • गाडी क्रमांक 01035
  • कधी धावणार? - 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर पर्यंत दररोज
  • वेळ - सकाळी 7.50 वाजता
  • कधी पोचणार? - त्याच दिवशी रात्री 10 वाजता
  • थांबे - रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावरडे, अरावली रोड, रत्नाूगिरी, अडावली, विलावडे, राजापुर रोड, वैभववाडी रोड, नांदगांव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग रोड, कुडाळ आणि झरप


सावंतवाडी - सीएसएमटी

  • गाडी क्रमांक - 01036
  • कधी धावणर? 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबरपर्यंत दररोज
  • वेळ - 11 वाजता
  • कधी पोहचणार? - दुस-या दिवशी दुपारी 12.25 वाजता
  • थांबे - झरप, कुडाळ, सिंधुदुर्ग रोड, कणकवली, नांदगांव रोड, वैभववाडी रोड, राजापुर रोड, विलावडे, अडावली, रत्नाागिरी, संगमेश्वलर रोड, अरावली रोड, सावरडे, चिपळूण, खेड, वीर, माणगांव, रोहा, पनवेल, ठाणे आणि दादर

या गाडीला 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 10 शयनयान श्रेणी, 6 सामान्यव द्वितीय श्रेणी डबे असतील


एलटीटी-रत्नागिरी- (डबल डेकर) वातानुकूलित विशेष

  • गाडी क्रमांक - 01187
  • कधी धावणार? - 4 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर 2018 पर्यंत प्रत्येक मंगळवारी
  • वेळ? - सकाळी 05.33 वाजता
  • कधी पोहचणार? - त्याच दिवशी दुपारी 2.30 वाजता
  • थांबे - ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावरडे, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड


रत्नागिरी - लोकमान्या टिळक टर्मिनस

  • गाडी क्रमांक - 01188
  • कधी धावणार? - 4 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक मंगळवारी
  • वेळ - दुपारी 4.20 वाजता
  • कधी पोहचणार? - त्याच दिवशी मध्य रात्री 12.30 वाजता
  • थांबे - ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावरडे, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड
    यागाडीला 6 वातानुकूलित डबल डेकर कुर्सीयान असतील


लोकमान्य टिळक टर्मिनस - पेडणे 

  • गाडी क्रमांक - 01038
  • कधी धावणार - 7 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर, प्रत्येक शुक्रवारी
  • वेळ - दुपारी 1.10 वाजता
  • कधी पोहचणार? - त्याच दिवशी दुपारी 2.30 वाजता
  • थांबे - ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, सावरडे, संगमेश्वपर रोड, रत्नाकगिरी, विलावडे, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग रोड, कुडाळ, झरप, सावंतवाडी रोड आणि मदुरे


पेडणे - लोकमान्यक टिळक टर्मिनस

  • गाडी क्रमांक - 01038
  • कधी धावणार? - 7 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी
  • वेळ - दुपारी 3.30 वाजता
  • कधी पोहचणार? - दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 05.00 वाजता
  • थांबे - ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, सावरडे, संगमेश्वपर रोड, रत्नाकगिरी, विलावडे, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग रोड, कुडाळ, झरप, सावंतवाडी रोड आणि मदुरे

या गाडीला 1 वातानुकूलित द्वितीय श्रेणी, 3 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 13 शयनयान एवं 3 सामान्य द्वितीय श्रेणी असे डबे असतील

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा