उन्हाळी सुट्ट्यांसाठी मुंबई-करमाळी अतिरिक्त ६ स्पेशल ट्रेन्स


SHARE

उन्हाळी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी कोकणात जाण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण मध्य रेल्वेने मुंबई आणि करमाळी दरम्यान ६ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

उन्हाळी सुटीमुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे या मार्गावर आणखी ६ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.


अशा असतील फेऱ्या

सीएसएमटी ते करमाळीदरम्यान दोन फेऱ्या, पनवेल ते करमाळीदरम्यान सुपरफास्ट स्पेशल चार फेऱ्या अशा एकूण सहा फेऱ्या चालवल्या जातील.

ट्रेन क्रमांक ൦११२७ सीएसएमटी ते करमाळीसाठीची विशेष गाडी ९ मे च्या मध्यरात्री १२.२൦ ला सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ११.३൦ वाजता करमाळीला पोहचेल.

तर, ट्रेन क्रमांक ൦११२८ ही गाडी ११ मे ला शुक्रवारी सकाळी १൦.२൦ वाजता करमाळीहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.१५ वा. सीएसएमटीला पोहचेल.


थांबा

दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम या गाड्यांना १५ स्लीपर क्लास आणि २ जनरल सेकंड क्लासचे डब्बे जोडण्यात आले आहेत.


पनवेल ते करमाळी

ट्रेन क्रमांक ൦११२९ ही पनवेल ते करमाळी गाडी पनवेल येथून ९ मे ला मध्यरात्री ११.४० ला सुटेल आणि करमाळीला सकाळी ९ वाजता पोहचेल. 


करमाळी ते पनवेल

ट्रेन क्रमांक ൦११३൦ ही सुपरफास्ट स्पेशल गाडी करमाळी येथून ९ मे ला दुपारी २ वाजता गाडी सुटेल आणि पनवेलला रात्री १०.४० ला पोहचेल. या सर्व गाड्यांचं आरक्षण १ मे पासून उपलब्ध होईल.


थांबा

रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम या गाड्यांना १५ स्लीपर क्लास आणि २ जनरल सेकंड क्लासचे डबे जोडण्यात आले आहेत.


विशेष गाडी

ट्रेन क्रमांक ൦११३१ गुरुवारी १൦ मे ला ११.४൦ वाजता पनवेलहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ९ वाजता करमाळीला पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ൦११३२ सुपरफास्ट विशेष गाडी गुरुवारीच १൦ मे ला १.४൦ वाजता करमाळीहून सुटेल. तर, त्याच दिवशी १൦.१५ ला पनवेलला पोहचेल.

संबंधित विषय
ताज्या बातम्या