Advertisement

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १४ विशेष रेल्वे गाड्या

६ डिसेंबर रोजी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १४ विशेष रेल्वे गाड्या
SHARES

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. १४ लांब पल्ल्याच्या गाड्या आणि १२ लोकल गाड्यांचा यामध्ये समावेश आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी ६ डिसेंबरला दादर येथील चैत्यभूमीवर हजारो अनुयायी येत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ६ डिसेंबर रोजी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये १४ लांब पल्ल्याच्या गाड्या आणि १२ लोकल गाड्यांचा समावेश आहे. लांब पल्ल्याच्या या विशेष गाड्या नागपूर, अजनी, सोलापूर, गुलबर्गा आणि इतर ठिकाणांवरुन सोडण्यात येणार आहेत.हेही वाचा -

महापरिनिर्वाण दिनानिमित्त हुसेनसागर एक्स्प्रेस मुंबईतून धावणार
संबंधित विषय