Advertisement

गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वे ड्रोन वापराच्या विचारात

येत्या काही दिवसांत लोकल सुरू केल्यास रेल्वे स्थानकात गर्दी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या वापराचा विचार मध्य रेल्वेकडून सुरू आहे.

गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वे ड्रोन वापराच्या विचारात
SHARES

दिवसेंदिवस लोकलनं (mumbai local) प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. अशातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं रेल्वे प्रशासनानं (railway) व राज्य सरकारनं अद्याप लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू केलेली नाही. त्यामुळं येत्या काही दिवसांत लोकल सुरू केल्यास रेल्वे स्थानकात गर्दी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या (dronecamera) वापराचा विचार मध्य रेल्वेकडून सुरू आहे. सध्या लोकल प्रवासादरम्यान कोरोना नियमांची अंमलबजावणी आणि गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेकडून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत.

मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांतील गर्दी नियंत्रणासाठी आता ड्रोन कॅमेऱ्याच्या वापराचा विचार मध्य रेल्वेकडून (central railway) सुरू आहे. मध्य रेल्वेकडून ड्रोन कॅमेराद्वारे स्थानकातील गर्दी नियंत्रणाचा प्रस्ताव आहे. सध्या मध्य रेल्वेकडे २ ड्रोन कॅमेरे आहेत. यार्डमधील चोऱ्या रोखता याव्यात म्हणून निगराणीसाठी त्याचा वापर रेल्वे सुरक्षा दलाकडून केला जातो.

रेल्वे स्थानकांतील गर्दी नियंत्रणासाठीही (passenger rush) प्रायोगिक तत्त्वावर या २ ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्याबाबत विचार केला जात आहे. सध्या रेल्वे स्थानकांत सीसीटीव्ही असून त्यावरूनही गर्दीवर रेल्वे सुरक्षा दलाकडून देखरेख ठेवली जाते. पण त्याच्या जोडीला ड्रोनचे तंत्रज्ञान आणले तर गर्दी नियंत्रणात तेवढीच मदतही मिळणार आहे.

एका विशिष्ट उंचीवर ड्रोन (drone) आणून स्थानकांतील गर्दी व प्रवाशांच्या हालचाली कॅमेऱ्यात टिपता येणार आहेत. त्यामुळं तात्काळ कर्मचाऱ्यांना तेथे पाठवून गर्दी हटवण्यास मदत होणार आहे. प्रथम सीएसएमटी, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह गर्दीच्या स्थानकांवर या ड्रोनचा वापर होऊ शकतो. प्रयोग यशस्वी झाल्यास ड्रोनची संख्या वाढवली जाणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा