माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान रविवार १४ फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मेगाब्लाॅकच्या वेळेत ठराविक लोकल फेऱ्या बंद राहणार असून उर्वरित लोकल फेऱ्या पर्यायी मार्गाने सुरू राहणार आहेत. मेगाब्लॉकच्या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मध्य रेल्वे
स्थानक - माटुंगा ते मुलुंड
मार्ग - अप आणि डाऊन जलद
वेळ - सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत
मेगाब्लॉकच्या वेळेत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही गाड्या विलंबाने धावतील.
हार्बर रेल्वे
स्थानक - सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे
मार्ग - अप आणि डाऊन
वेळ - सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत
सीएसएमटी/वडाळा रोडवरून पनवेल-वाशीसाठी सुटणाऱ्या आणि सीएसएमटीहून वांद्रे/गोरेगावसाठी सुटणाऱ्या मार्गावरील अप-डाऊन फेऱ्या बंद राहतील. ब्लॉक काळात पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष फेऱ्या चालविल्या जातील. मेल-एक्स्प्रेस गाड्या काहीशा विलंबाने धावतील. मेगाब्लॉक वेळेत सीएसएमटी-वाशी आणि ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकातील लोकल सुरू राहणार आहेत.