Advertisement

"मला कोरोना झालाय", प्रवाशाच्या खुलाश्यानंतर विमानात गोंधळ

विमान उड्डाण घेण्याच्या काही मिनिटं आधी प्रवाशानं COVID 19 पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं.

"मला कोरोना झालाय", प्रवाशाच्या खुलाश्यानंतर विमानात गोंधळ
SHARES

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुण्याला जाणाऱ्या विमानात गोंधळ झाला आहे. विमान उड्डाण घेण्याच्या काही मिनिटं आधी प्रवाशानं COVID 19 पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं. हे कळताच विमानात एकच गोंधळ उडाला. त्यामुळे विमान थांबवण्यात आलं.

इंडिगोच्या एका अधिकाऱ्यानं शुक्रवारी एएनआयला सांगितलं की, " ४ मार्च रोजी पुण्याल्या जाणाऱ्या विमानात एका प्रवाशानं जाहीर केलं की आपण कोविड पॉझिटिव्ह आहोत. तो कोविड पॉझिटिव्ह होता. त्याने विमानातील कर्मचाऱ्यांना विमानात बसल्यावर माहिती दिली."

या प्रवाशानं केलेल्या घोषणेनंतर उड्डाणातील उर्वरित प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. विमान धावपट्टीवर असताना आणि पुण्याला निघाण्यासाठी उड्डाण घेणार असतानाच ही संपूर्ण घटना घडली.

"या घटनेमुळे उड्डाण सुमारे दोन तास उशिरा असल्याची माहिती मिळाली. विमानाच्या पायलटनं उड्डाणमार्गावरून टॅक्सी-बेकडे उड्डाण नेलं. Covid 19 पॉझिटिव्ह प्रवाशासह सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं. त्यानंतर, विमानांची स्वस्छटा जसं की सीट कव्हर्स बदलण्यात आले," असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

“विमान कंपनीनं सरकार आणि विमानन प्राधिकरणानं दिलेल्या covid 19 मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केलं होतं,” असं अधिकाऱ्यानं सांगितलं

कोविड १९ पॉझिटिव्ह असल्याचा दावा करणाऱ्या प्रवाशाला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं आणि त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली.Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा