Advertisement

मुंबईत सीएनजी गॅसच्या दरात कपात

मध्यरात्रीपासून नवीन दर लागू

मुंबईत सीएनजी गॅसच्या दरात कपात
SHARES

इंधन दरवाढीमुळे होरपळणाऱ्या वाहनचालकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. महानगर गॅस लिमिटेडने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत सीएनजीचे दर कमी झाले आहेत. मंगळवारी 5 मार्चच्या मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात कपात करण्यात आली आहे. महानगर गॅस लिमिटेडने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

महानगर गॅस लिमिटेडच्या म्हणण्यानुसार, मुंबईत सीएनजीच्या दरात प्रति किलो 2.50 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. अशा स्थितीत आता मुंबईकरांना एक किलो सीएनजीसाठी केवळ 73.40 रुपये मोजावे लागणार आहेत. महानगर गॅस लिमिटेडच्या सीएनजीच्या दरात कपात करण्याच्या निर्णयाचे मुंबईकरांनी स्वागत केले आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात सीएनजी वाहने आहेत. दर कमी झाल्याने या चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, सीएनजीचे दर कमी झाले असले तरी पीएनजीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. याआधी ऑक्टोबर महिन्यात महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी-पीएनजीच्या किमती कमी केल्या होत्या. त्यावेळी सीएनजीच्या दरात तीन रुपयांनी तर पीएनजीच्या दरात दोन रुपयांनी कपात करण्यात आली होती.

दरम्यान, उत्पादन खर्चात कपात झाल्याने आगामी काळात देशाच्या इतर भागांमध्ये सीएनजीचे दर कमी होण्याची दाट शक्यता आहे. येत्या काळात निवडणुकाही होणार असल्याने केंद्र सरकार इंधनाचे दर कमी करण्याचा निर्णय घेऊ शकते. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.



हेही वाचा

ट्रॅफिक पोलिस कॉन्स्टेबलकडूनच वाहतूक नियमांचे उल्लंघन

मुंबईतील रेल्वे, मेट्रो स्थानकात बसवण्यात येणार 188 एईडी मशिन्स

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा