Advertisement

बेस्ट आगाराबाहेरील पत्रकामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांमध्येच संभ्रम


बेस्ट आगाराबाहेरील पत्रकामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांमध्येच संभ्रम
SHARES

दिवाळीपूर्वी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना ५,५०० रुपयांचा बोनस देण्याचं जाहीर केलं होतं. मात्र, बेस्ट प्रशासनानं कामगारांना दिवाळीपूर्वी दिलेलं हे आश्वासन अजून देखील पूर्ण केलं नाही. त्यामुळे बेस्ट कामगारांमध्ये संतापचं वातावरण निर्माण झालं असून संपाची हाक देणारं पत्र बस आगारांबाहेर लावले जात आहेत. परंतु, या पत्रकांची जबाबदारी कोणतीही संघटना घेत नसल्यामुळं कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.


तरी बोनस नाही

बेस्ट कामगारांच्या प्रत्येक महिन्याचा पगार देखील उशीरानं होत आहेत. दरम्यान, कामगार संघटनांच्या दबावामुळे बेस्ट प्रशासनाने कामगरांना ५,५०० रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दिवाळी संपली तरी देखील कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात आलेला नाही.


कामगार नाराज

बोनस न मिळाल्यामुळे कामगारांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माणं झालं आहे. दरम्यान, या असंतोषाचं रुपांतर संपात होण्याची शक्यता असणारं पत्रक बस आगारांमध्ये लावण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे हिवाळी अधिवेशनात बेस्टला मदत करण्यावर जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत बेमुदत संप सुरूच ठेवण्याचा इशारा या पत्रकातून देण्यात आला आहे. त्यानुसार, हा संप सुरू होणार होता. मात्र, या पत्रकाची जबाबदारी कोणत्याच संघटनांनी घेतलेली नाही.


'हा' मुद्दा अधिवेशनात मांडा

महापालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प विलीन करण्याची मागणी या पत्रकातून करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनात बेस्ट उपक्रमातील आर्थिक अडचणींचा विषय चर्चेत आणावा, यांसारख्या मागण्या या पत्रकाद्वारे करण्यात आल्या आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा