Advertisement

एसटीची मोठी धाव, ५ लाखांहून अधिक परप्रांतीय मजुरांना पोहोचवलं

लाॅकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्या मजुरांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ठिकठिकाणी बस उपलब्ध करून दिल्या.

एसटीची मोठी धाव, ५ लाखांहून अधिक परप्रांतीय मजुरांना पोहोचवलं
SHARES

कोरोना संकटाच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे मोठ्या संख्येने परप्रांतीय मजूर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत अडकले होते. या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यांत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्या (coronavirus live updates msrtc transports 5 lakh 37 thousand migrant workers from maharashtra during lockdown) राज्याच्या चोहोबाजूंना धावल्या. ३१ मे पर्यंत या एस.टी बसगाड्यांनी तब्बल १५२.४२ लाख कि.मी चा प्रवास करत ४४ हजार १०६ बस फेऱ्यांमधून ५ लाख ३७ हजार ५९३ स्थलांतरीत मजुरांना रेल्वे स्थानक आणि त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवलं.

१०.८९ कोटी खर्च

लाॅकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्या मजुरांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ठिकठिकाणी बस उपलब्ध करून दिल्या. एस.टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुखरूप त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन पोहोचवलं, त्यासाठी राज्य शासनाने १०.८९ कोटी रुपयांचा खर्च देखील केला.

औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती अशा एस.टी. महामंडळाच्या ६ प्रदेशातून  नागरिकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत जाण्यासाठी, रेल्वेस्टेशनपर्यंत जाण्यासाठी एस.टी महामंडळाने बसगाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली.

हेही वाचा - कर्मचाऱ्यांसाठी धावणार एसटीच्या अतिरिक्त २५० बसेस

रेल्वे स्टेशनवर पोहोचवलं

उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि आसाम, राजस्थान, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, हिमाचलप्रदेश, पंजाब, तामिळनाडू अशा विविध राज्यात रेल्वेने जाणाऱ्या मजूरांना रेल्वेस्टेशनपर्यंत सोडण्याचं काम एस.टी महामंडळाच्या बसने केलं.  २ लाख २८ हजार १०० प्रवाशांनी बसच्या या सुविधेचा लाभ घेतला.

राज्याच्या सीमेवर सोडलं

गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक राज्याच्या सीमेपर्यंत धावून एस.टीने त्या राज्यातील लोकांना त्यांच्या राज्याच्या जवळ नेऊन पोहोचवले, या सुविधेचा तब्बल  ३ लाख  ०९ हजार ४९३ प्रवाशांनी लाभ घेतला.

‘या’ जिल्ह्यांमधून बस उपलब्ध  

औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, अमरावती विभागातून अमरावती, अकोला, बुलडाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधून एस.टी. बसगाड्या  उपलब्ध करून देण्यात आल्या.

हेही वाचा - एसटीच्या सुमारे २४५१ चालक, वाहकांची गैरहजेरी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा