दीडशेहून अधिक वर्षे जुना कार्नॅक पूल (Carnac bridge) लवकरच इतिहासजमा होणार आहे. मध्य रेल्वेने 19 आणि 20 नोव्हेंबर (शनिवार/रविवार) रोजी भायखळा ते CSMT दरम्यान 27 तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
किती वाजता ब्लॉक सुरू होईल?
मध्य रेल्वेने 27 तासांचा ब्लॉक घोषित केला आहे. 19 ते 21 नोव्हेंबर रोजी सीएसएमटी ते भायखळा दरम्यान कर्नाक बंदर पूल पाडण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येईल, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. शनिवारी रात्री 11 वाजता हा ब्लॉक सुरु होणार आहे.
'या' स्थानकांवर रेल्वे सेवा बंद
ब्लॉक कालावधीत, भायखळा-सीएसएमटी आणि वडाळा-सीएसएमटी दरम्यानच्या सर्व रेल्वे सेवा बंद राहतील.
भायखळा, परळ आणि दादर येथून मुख्य मार्गावर आणि वडाळा येथून हार्बर मार्गावर ठराविक अंतराने विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत.
लोकल सेवा कधी सुरू होणार?
या ब्लॉकमुळे सीएसएमटी ते भायखळा दरम्यान मुख्य मार्गावरील सर्व धीम्या आणि जलद लोकल सेवा १७ तासांसाठी बंद राहणार आहेत.
तसेच हार्बर मार्गावरील लोकल सेवा सीएसएमटी ते वडाळा दरम्यान २१ तास उपलब्ध राहणार नाही आणि सीएसएमटी ते भायखळा दरम्यानच्या लांब पल्ल्याच्या गाड्या २७ तासांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत.
मुंबई लोकलची मुख्य मार्गिका १७ तासानंतर आणि हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या २१ तासानंतर सुरू होणार आहेत. मेल एक्स्प्रेस मार्गिका २७ तासानंतर खुली होईल, अशी माहिती रेल्वेकडून देणण्यात आली आहे.
३६ मेल एक्स्प्रेस पूर्णपणे रद्द
ब्लॉक कालावधीत ३६ मेल एक्स्प्रेस पूर्णपणे रद्द राहणार असून दादर, पनवेल, नाशिक आणि पूणे या ठिकाणी ६८ मेल-एक्स्प्रेस अंशतः रद्द राहणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा