Advertisement

औरंगाबाद-दिल्ली-मुंबई विमान सेवा पूर्ववत

कोरोना रुग्णांची संख्या फार लक्षणीय नसल्यामुळे मार्च महिन्यापासून उड्डाणे पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

औरंगाबाद-दिल्ली-मुंबई विमान सेवा पूर्ववत
SHARES

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाल्यामुळे औरंगाबादमधील चिकलठाणा विमानतळावरून १ मार्चपासून दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी एकूण पाच उड्डाणे सुरू होत आहेत.

इंडिगोची तीन तर एअर इंडियाची दोन विमाने दुपार आणि संध्याकाळच्या सत्रात उड्डाणे घेतील.

  • मुंबई- संध्याकाळी ७.०० वाजता इंडिगोचे फ्लाइट
  • दिल्ली- संध्याकाळी ७.३० वाजता इंडिगोचे फ्लाइट
  • मुंबई- रात्री ८.३० वाजता एअर इंडियाचे फ्लाइट
  • हैदराबाद- संध्याकाळी ५.१० वाजता इंडिगोचे फ्लाइट
  • दिल्ली- संध्याकाळी ५.२० वाजता एअर इंडियाचे फ्लाइट

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे औरंगाबादमधून (Aurangabad Airport) इंडिगोनं (Indigo) जवळपास ३३ उड्डाणे रद्द केली होती. त्यामुळे औरंगाबादहून दिल्ली, मुंबईला फक्त एअर इंडियाचीच (Air India) उड्डाणे सुरू होती.

प्रवासी संख्या घटल्यामुळे कंपनीनं काही विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता कोरोना रुग्णांची संख्या फार लक्षणीय नसल्यामुळे मार्च महिन्यापासून उड्डाणे पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या पंधरा दिवसात प्रवासी संख्या वाढल्यास बंगळुरूसाठीदेखील उड्डाण सुरू करण्यात येईल, असे संकेत विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

प्रवासी संख्या वाढू लागल्यानंतर मार्चअखेरीस आणखी उड्डाणे सुरू होण्याची शक्यता आहे. येत्या १५ दिवसात बंगळुरुसाठीही विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.

कोरोना लाटेपूर्वी दररोज १२ विमाने औरंगाबादमधील विमानतळावर ये-जा करत होती. विमानतळ प्राधिकरणाचे संचालक डी.जी. साळवे म्हणाले, पुढील काळात सर्वकाही सुरळीत राहिल्यास विमानांची संख्या वाढू शकते.



हेही वाचा

बेस्ट युनियनतर्फे २ मार्चला महाआंदोलन, प्रवाशांचे हाल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा