Advertisement

corona virus : रेल्वेकडून एसी डब्यातील पडदे काढण्याचा निर्णय

डब्यात देण्यात येणार्‍या या गोष्टी रोज धुतल्या जात नाहीत. तूर्तास प्रवाशांनी या गोष्टी स्वत:च्या स्वत: आणाव्यात, रेल्वेतर्फे पुरवण्यात येणार नाहीत असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

corona virus : रेल्वेकडून एसी डब्यातील पडदे काढण्याचा निर्णय
SHARES

कोरोनाचा देशभरातला वाढता फैलाव लक्षात घेता रेल्वेने एसी डब्यातले पडदे, ब्लँकेट्स काढण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील सूचना येईपयर्ंत हे पडदे, उशा, ब्लँकेट्स काढण्यात येणार आहेत. डब्यात देण्यात येणार्‍या या गोष्टी रोज धुतल्या जात नाहीत. तूर्तास प्रवाशांनी या गोष्टी स्वत:च्या स्वत: आणाव्यात, रेल्वेतर्फे पुरवण्यात येणार नाहीत असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

हेही वाचाः- Coronavirus : हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टर- नर्सेसच्या चाचण्या निगेटिव्ह

दरम्यान, मुंबईच्या लोकल प्रवासात, गर्दीत कोरोनाचे काय करायचे असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. रेल्वेने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यासाठी लोकल गाड्यांमुळे जंतूनाशक फवारणी केली जात आहे. मध्य रेल्वेने डबे निर्जंतुक करण्यासाठी काचा, हँडरेस्ट, हँडल्स, उभे राहण्याची जागा, सीट्स, लोकलच्या आतले आणि बाहेरचे पृष्ठभाग साफ करायला घेतले आहे. रेल्वे कर्मचारी सातत्याने सफाई करताना सध्या दिसत आहेत. यार्डात उभ्या असलेल्या गाड्यांमध्ये जंतूनाशकांची फवारणी केली जात आहे. कुर्ला कारशेडमध्ये हे काम सकाळी गाडी निघण्यापूर्वी आणि रात्रीच्या वेळी सुरू आहे. रेल्वेच्या डब्ब्यांमध्ये कोरोनाविषयी काळजी घेण्याबाबतची पत्रकही लावण्यात आली आहेत. तसेच रेल्वेच्या डब्ब्यांमध्ये स्पीकरवर कोरोनाविषयीच्या जनजागृतीसाठी माहितीपूर्वक संदेशही देण्यात येत आहे. पश्‍चिम रेल्वेने 'तुम पास आए, यूं मुस्कुराए, हाथ मिलाए तो वायरस फैलाए' अशा आशयाचे ट्विट करत कोरोनासंबंधी जागरुकेसाठी, काळजी घेण्याचे सांगितले आहे.

 रेल्वे स्थानकावर कोरोना हेल्प डेस्क

नैर्त्रुत्य रेल्वेने खबरदारीचा उपाय म्हणून महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.६०० हून अधिक भित्ती पत्रके लावण्यात आली आहेत. बेळगावबरोबरच हुबळी, म्हैसूर, वास्को, विजापूर, गदग, बळ्ळारी, अळणावर व बागलकोट या रेल्वे स्थानकांवर हेल्प डेस्क उभारण्यात आले आहेत. आरोग्य यंत्रणेच्या साहाय्याने डॉक्टर्स व नर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रेल्वेच्या कर्मचाऱयांना मास्क वापरण्याची सूचना करण्यात आली आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा