प्लॅटफॉर्म बंद मुळे प्रवाशांचे हाल


  • प्लॅटफॉर्म बंद मुळे प्रवाशांचे हाल
SHARE

मुंबई -  घाटकोपर मेट्रो स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 गेल्या आठ-दहा दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे एकाच प्लॅटफॉर्मवरून मेट्रो गाडीची ये-जा सुरू असून त्याचा त्रास प्रवाशांना होत आहे. एकाच प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)कडे टि्वटऱवरून तक्रार केली आहे. हा फ्लॅटफाॅर्म त्वरीत सुरू करावा आणि प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या