Advertisement

ओव्हरहेड वायर तुटल्यामुळं हार्बरवरील वाहतूक विस्कळीत


ओव्हरहेड वायर तुटल्यामुळं हार्बरवरील वाहतूक विस्कळीत
SHARES

पनवेल आणि खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.सकाळी ६ वाजल्यापासून ही वाहतूक सेवा खोळंबल्यामुळं पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या आणि पनवेलहून सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लोकल एकाच जागी थांबून होत्या. परंतु आता धिम्या गतीने ही वाहतूक सुरू आहे.

पनवेल आणि खांदेश्वर स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याची माहिती खारघर रेल्वे स्थानकात घोषणा करुन प्रवाशांना देण्यात आली. तसंच, रेल्वेकडून या तांत्रिक बिघाडाच्या दुरुस्तीचे युद्धपातळीवर काम सुरु करण्यात आलं.

हार्बर रेल्वे विस्कळीत झाल्यामुळं सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना फटका बसला आहे. प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोर जावं लागत आहे. लोकल येत नसल्यामुळे रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढत चालली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा